T20 World Cup 2024 IND vs PAK Terror Threat News sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024 IND vs PAK : खरंच भारत-पाकिस्तान सामन्यावर दहशतवादी हल्ला होणार का? ICCने तोडले मौन

India Vs Pakistan T20 World Cup 2024 : यंदाचा टी-20 वर्ल्ड कप वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत आयोजित केला जाणार आहे. ही स्पर्धा 20 संघांमध्ये 1 जूनपासून रंगणार आहे.

Kiran Mahanavar

India Vs Pakistan T20 World Cup 2024 : यंदाचा टी-20 वर्ल्ड कप वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत आयोजित केला जाणार आहे. ही स्पर्धा 20 संघांमध्ये 1 जूनपासून रंगणार आहे. पण या स्पर्धेत मोठा धोका निर्माण झाला आहे.

अलीकडेच या स्पर्धेदरम्यान कॅरेबियन देशांमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या धमक्या आल्या होत्या. पण आता हा धोका भारत-पाकिस्तान सामन्यावरही आला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 9 जून रोजी होणार आहे. याआधी एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर आली आहे.

डेली एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, भारत-पाकिस्तान सामन्यावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. यामुळे न्यूयॉर्क पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. पण अधिकाऱ्यांना आतापर्यंत कथित धमकीचे समर्थन करण्यासाठी कोणतेही सबळ पुरावे सापडलेले नाहीत. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने याबाबत मौन तोडले आहे.

क्रिकबझच्या वृत्तानुसार आयसीसीच्या प्रवक्त्याने या प्रकरणाबाबत सांगितले की,'इव्हेंटमधील प्रत्येकाची सुरक्षा ही आमची पहिली प्राथमिकता आहे. आमच्याकडे सर्वसमावेशक आणि चांगली सुरक्षा योजना आहे. आम्ही यजमान देशांमधील अधिकाऱ्यांसोबत काम करत आहे. आणि जोखीम कमी करण्यासाठी आमच्याकडे योग्य योजना आहेत.

तत्पूर्वी, 9 जून रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याबाबत दहशतवादी धमकीचा अहवाल आल्यानंतर न्यूयॉर्कच्या गव्हर्नरच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात, आयझेनहॉवर पार्क स्टेडियमवर सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

सीबीएस न्यूजच्या वृत्तानुसार, भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. स्टेडियमच्या मैदानात प्रवेश करण्यासाठी चाहत्यांना मेटल डिटेक्टरमधून जावे लागेल. त्यांना बॅग / ड्रोन नेण्यास मनाई असेल. आणि सामन्यादरम्यान सर्वत्र पोलिस बंदोबस्त असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT