ICC Men's T20 World Cup 2024 Super 8 round Schedule sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

ICC ची घोषणा! T20 World Cup 2024 ‘सुपर-8’चे शेड्यूल जाहीर; कोणाचा सामना, कधी अन् कोणाशी; जाणून घ्या शेड्यूल

ICC Men's T20 World Cup 2024 Super 8 round Schedule: टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये साखळी फेरीचा टप्पा येत्या मंगळवारी संपणार आहे. त्यानंतर बुधवारपासून ‘सुपर आठ’ फेरीचा थरार रंगणार आहे.

Kiran Mahanavar

ICC Men's T20 World Cup 2024 Super 8 round full schedule: टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये साखळी फेरीचा टप्पा येत्या मंगळवारी संपणार आहे. त्यानंतर बुधवारपासून ‘सुपर आठ’ फेरीचा थरार रंगणार आहे. बांगलादेशने शेवटच्या साखळी सामन्यात नेपाळ संघाचा २१ धावांनी पराभव केला आहे. हा सामना जिंकून बांगलादेशचा संघ सुपर-8 साठी पात्र ठरला आहे. दरम्यान, नेदरलँड्सच्या आशा पल्लवित झाल्या असून तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

भारतीय संघ २० जून रोजी ‘सुपर आठ’ फेरीचा पहिला सामना खेळणार आहे. या लढतीत भारताला अफगाणिस्तानचा सामना करावा लागणार आहे, तसेच टीम इंडियासमोर २२ जून रोजी बांगलादेशचे आव्हान असणार आहे. अखेर २४ जून रोजी बलाढ्य संघ ऑस्ट्रेलिया भारताशी दोन हात करील.

‘सुपर आठ’ फेरीची गटवारी

गट एक - भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, बांगलादेश

गट दोन - इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, अमेरिका

‘सुपर आठ’ फेरीचे वेळापत्रक

(ICC Men's T20 World Cup 2024 Super 8 round full schedule)

१९ जून - दक्षिण आफ्रिका वि. अमेरिका, रात्री आठ वाजता, अँटिग्वा

२० जून - इंग्लंड - वेस्ट इंडीज, पहाटे सहा वाजता, सेंट लुशिया

२० जून - अफगाणिस्तान - भारत, रात्री आठ वाजता, ब्रिजटाऊन

२१ जून - ऑस्ट्रेलिया - बांगलादेश, पहाटे सहा वाजता, अँटिग्वा

२१ जून - इंग्लंड - दक्षिण आफ्रिका, रात्री आठ वाजता, सेंट लुशिया

२२ जून - वेस्ट इंडीज - अमेरिका, पहाटे सहा वाजता, ब्रिजटाऊन

२२ जून - भारत - बांगलादेश, रात्री आठ वाजता, अँटिग्वा

२३ जून - अफगाणिस्तान - ऑस्ट्रेलिया, पहाटे सहा वाजता, सेंट विन्सेंट

२३ जून - इंग्लंड - अमेरिका, रात्री आठ वाजता, ब्रिजटाऊन

२४ जून - वेस्ट इंडीज - दक्षिण आफ्रिका, पहाटे सहा वाजता, अँटिग्वा

२४ जून - भारत - ऑस्ट्रेलिया, रात्री आठ वाजता, सेंट लुशिया

२५ जून - अफगाणिस्तान - बांगलादेश, पहाटे सहा वाजता, सेंट विन्सेंट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT