Team India Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs PAK : टीम इंडियातील हे खेळाडू पाक विरुद्ध पहिल्यांदाच खेळणार

दोन्ही देशातील क्रिकेट चाहते सामन्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत.

सुशांत जाधव

टी 20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) स्पर्धेतील बहुचर्चित सामना अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणाऱ्या सामन्यात भारतीय संघ आपला दबदबा कायम ठेवणार की पाकिस्तान आतापर्यंत न जमलेली गोष्ट करुन दाखवणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दोन्ही देशातील क्रिकेट चाहते सामन्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत. चाहत्यांच्या अपेक्षांचा दोन्ही संघातील खेळाडूंवर चांगलाच दबाव असतो. ज्या संघातील खेळाडू हा दबाव बाजूला सारुन क्षमता सिद्ध करतील ते भारी ठरतात.

विराट कोहली आणि बाबर आझमच्या संघात कोणते खेळाडू चमकणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. दोन्ही संघात अनुभव आणि युवा जोश यांचे संतुलन पाहायला मिळते. भारतीय संघाचा विचार केल्यास अनेक खेळाडूंना पाकिस्तान विरुद्धच्या हायहोल्टेज सामना खेळण्याचा अनुभव आहे. पण काही खेळाडू नवीन आहेत. त्यांच्यासाठी हा सामना एक पर्वणीच असेल. जाणून घेऊयात टीम इंडियातील कोणते खेळाडू असे आहेत जे पहिल्यांदाच पाकिस्तान विरुद्ध खेळताना दिसू शकते.

शार्दुल ठाकुर

अखेरच्या टप्प्यात मुंबईकर शार्दुल ठाकूरला अक्षर पटेलच्या जागी मुख्य संघात स्थान देण्यात आले. मोक्याच्या क्षणी विकेट घेत प्रतिस्पर्धी संघाला अडचणीत आणण्याची क्षमता शार्दुल ठाकूरमध्ये आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याला संधी मिळाली तर त्याच्यासाठी हा खास सामना ठरु शकतो. पाकिस्तान विरुद्ध आतापर्यंत त्याने एकही सामना खेळलेला नाही.

सुर्यकुमार यादव

पाकिस्तान विरुद्ध एकही सामना खेळलेला नाही अशा खेळाडूंच्या यादीत सुर्यकुमार यादवचाही समावेश आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचे स्थान पक्के मानले जात आहे. यंदाच्या वर्षीय आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या सुर्यासाठी पाक विरुद्ध खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल. भारताचा मिस्टर 360 अशी ओळख असलेला सूर्या दुबईच्या मैदानात पाक विरुद्ध कशी कामगिरी करतोय हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

रिषभ पंत

भारतीय संघात यष्टीमागील भूमिकेसह फलंदाजीतील फटकेबाजीच्या जोरावर सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असणारा रिषभ पंतही पाकिस्तान विरुद्ध पहिलाच सामना खेळणार आहे. रिषभ पंत बऱ्याच काळापासून टीम इंडियासोबत आहे. 2019 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत तो भारतीय संघासोबत होता. पण पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याला संधी मिळाली नव्हती. त्यामुळे दुबईच्या मैदानात पाकिस्तान विरुद्ध तो पहिला सामना खेळण्यासाठीच मैदानात उतरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT