Aiden Markram  Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Video : मार्करम झाला सुपरमॅन; हवेत उडी मारुन टिपला भन्नाट झेल

मार्करमने हवेत उडी मारुन अप्रतिम झेल घेत स्मिथच्या खेळीला ब्रेक लावला.

सुशांत जाधव

Australia vs South Africa : दक्षिण आफ्रिकेनं ठेवलेल्या मोजक्या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांचीही चांगलीच गोची झाली. नोर्तजेनं फिंचला खातेही उघडू दिले नाही. त्याच्यापाठोपाठ डेव्हिड वॉर्नर 14 आणि मिशेल मार्श 11 धावा करुन तंबूत परतल्यावर स्मिथने संघाचा डाव सावरला. स्मिथनं 34 चेंडूत धावांची आश्वासक खेळी केली. सलामीच्या लढतीत तो सराव सामन्याप्रमाणे अर्धशतकी खेळी करेल, असे वाटत होते. मात्र नॉर्तजेच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात तो झेल बाद झाला. ही विकेट नोर्तजेच्या खात्यात जमा झाली असली तरी या विकेटचे संपूर्ण श्रेय हे मार्करमला जाते. मार्करमने हवेत उडी मारुन अप्रतिम झेल घेत स्मिथच्या खेळीला ब्रेक लावला.

ऑस्ट्रेलियाच्या डावातील 15 व्या षटकातील नोर्तजेनं टाकलेल्या पाचव्या चेंडूवर स्मिथने पूल शॉट मारला. चेंडू त्याच्या म्हणावा तसा टप्प्यात आला नाही. बॅटची कडेला लागल्यामुळे चेंडू हवेत उडाला. मिडविकेटला फिल्डर नसलेल्या ठिकाणी हा चेंडू पडेल, असे वाटत होते. पण लॉन्ग ऑनच्या दिशेने पळत येऊन मार्करमने क्षेत्ररक्षणाचा सर्वोत्तम दर्जा दाखवून देत अशक्यप्राय वाटणारा झेल टिपला. त्याचा हा झेल स्पर्धेतील सर्वोत्तम झेलपैकी एक ठरु शकतो.

क्षेत्ररक्षणात कमालीची ऊर्जा दाखवणाऱ्या मार्करमने फलंदाजीतही संघाचा डाव सावरला होता. आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर मार्करमने दक्षिण आफ्रिकेकडून सर्वोच्च 40 धावांची खेळी केली. 36 चेंडूचा सामना करताना त्याने 3 चौकार आणि 1 षटकारही खेचला. दोन्ही डावातील मिळूनही सर्वोच्च खेळी ठरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : सत्ताधाऱ्यांना माध्यमांनी प्रश्‍न विचारावेत, उद्धव ठाकरे यांची अपेक्षा; भाजपला सोडले की हिंदुत्व जाते का?

Zubeen Garg Death : झुबीन यांच्यावर विषप्रयोग? व्यवस्थापक, आयोजकावर कटाचा आरोप

OBC Reservation : ओबीसी संघटना मोर्चावर ठाम, सरकारसोबत बैठकीत तोडगा नाही; श्वेतपत्रिकेचा आग्रह कायम

साप्ताहिक राशिभविष्य : (०५ ऑक्टोबर २०२५ ते ११ ऑक्टोबर २०२५)

Anil Parab : कदमांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार, अनिल परब यांचे प्रत्युत्तर; त्यांची ‘नार्को’ चाचणी करावी

SCROLL FOR NEXT