USA vs Canada ICC Men's T20 World Cup 2024 News Marathi sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024 : आजपासून रंगणार टी-20 वर्ल्ड कप थरार! पहिल्या सामन्यात कॅनडाविरुद्ध यजमान अमेरिकेने जिंकली नाणेफेक

USA vs Canada ICC Men's T20 World Cup 2024 : या नवव्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे दुसरे सहयजमान अमेरिकाही आज आपला सलामीला सामना खेळणार आहे. कॅनडा हे त्यांचे प्रतिस्पर्धी असणार आहेत.

Kiran Mahanavar

USA vs Canada ICC Men's T20 World Cup 2024 : या नवव्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे दुसरे सहयजमान अमेरिकाही आज आपला सलामीला सामना खेळणार आहे. कॅनडा हे त्यांचे प्रतिस्पर्धी असणार आहेत. अमेरिकेकडून ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू स्टूअर्ट लॉ हे प्रशिक्षक असल्यामुळे त्यांची बाजू वरचढ आहे. त्यातच कॅनडाची ही पदार्पणाची स्पर्धा आहे.

पहिल्या सामन्यात सह-यजमान अमेरिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

क्रिकेट विश्वासाठी अमेरिकेच्या संघाची ओळख नवी असली तरी त्यांना कमी लेखण्याची चूक कोणीही करणार नाही. या विश्वकरंडक स्पर्धेच्या तयारीसाठी झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत त्यांनी २-१ असा विजय मिळवला होता. तसेत कॅनडाविरुद्धच्याही मालिकेत त्यांनी ४-० अशी बाजी मारली होती.

अमेरिका संघात २०१५ मध्ये एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट अंतिम सामन्यात खेळलेला न्यूझीलंडचा कॉरी अँडरसन खेळत आहे. त्याचा अनुभव अमेरिका संघासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. अमेरिकेचे नेतृत्व यष्टीरक्षक फलंदाज मोनाक पटेल करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित आर्याने १७ मुलांना जमवलं कसं? गोळी झाडली की नाही? एन्काउंटरबाबत मोठे अपडेट समोर

Belagav Black Day : काळा दिनानिमित्त बेळगावात आज निषेध फेरी; कर्नाटक प्रशासनाकडून महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश बंदीच्या नोटिसा

Latest Marathi News Live Update : मराठी भाषकांवर अन्याय, बेळगाव सीमाभागात आज काळा दिन पाळला जाणार

MNS and MVA Morcha in Mumbai : निवडणूक आयोगाविरोधात आज 'मनसे'सह ‘मविआ’चा मुंबईत निघणार ‘सत्याचा मोर्चा’

‘HSRP’ नंबरप्लेट नंबर नसल्यास होणार ‘इतका’ दंड! पहिल्यांदा १००० रुपये, त्यानंतर प्रत्येकवेळी १५०० रुपये दंड; सोलापूर जिल्ह्यात ७,२६,९१८ वाहनांना जुनीच नंबरप्लेट

SCROLL FOR NEXT