T20 World Cup 2024 Super-8 sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024 Super-8 : सुपर-8चे समीकरण स्पष्ट, दिग्गज संघांना बसला धक्का! 'या' 7 टीम जवळपास निश्चित...

T20 World Cup 2024 Super-8 Qualification Scenarios : आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 चा रोमांचक टप्पा सुरू आहे. युगांडाचा पराभव करून वेस्ट इंडिजने इतिहास रचला आहे. कॅरेबियन संघाच्या या विजयामुळे सुपर-8 चे समीकरणही जवळपास स्पष्ट झाले आहे.

Kiran Mahanavar

T20 World Cup 2024 Super-8 : वेस्ट इंडिजने युगांडावर ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. या विजयानंतर सुपर-8 चे समीकरणही जवळपास सुटले आहे. वेस्ट इंडिजने सुपर-8 साठी आपला मजबूत दावा मांडला असून त्याची पात्रता जवळपास निश्चित झाली आहे. आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 चा 18 वा सामना वेस्ट इंडिजने युगांडा विरुद्ध खेळला. या सामन्यात वेस्ट इंडिजचा एकतर्फी विजय झाला होता. प्रथम फलंदाजी करताना कॅरेबियन संघाने स्कोअरबोर्डवर 173 धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात युगांडाचा संघ अवघ्या 39 धावांवर ऑलआऊट झाला.

वेस्ट इंडिज आणि युगांडा हे दोन्ही संघ क गटात आहेत. यंदाच्या वर्ल्ड कप 2024 साठी आयसीसीने सर्व 20 संघांना एकूण 4 गटांमध्ये ठेवले आले. क गटातील दोन्ही संघ जवळपास निश्चित झाले आहेत, जे सुपर-8 साठी पात्र ठरतील. अफगाणिस्तान या गटात 2 सामन्यांतून 4 गुण आणि +5.225 नेट रन नेटसह पहिल्या स्थानावर आहे. याशिवाय वेस्ट इंडिजही 2 सामन्यांत 4 गुण आणि +3.574 च्या नेट रन नेटने दुसऱ्या स्थानावर आहे. या दोन्ही संघांचा नेट रन नेट अतिशय चांगला आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघ एक एक सामना जिंकून सुपर-8 साठी पात्र ठरतील.

अ गटात अमेरिका 2 सामन्यात 2 विजय नोंदवून 4 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे, तर भारताने देखील आतापर्यंत खेळलेला एकमेव सामना जिंकला आहे आणि गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. अशा स्थितीत हे दोन्ही संघ अ गटातून सुपर-8 साठी पात्र ठरतील. या गटातून पाकिस्तान संघ बाहेर जाऊ शकतो.

ऑस्ट्रेलियाने ब गटातून 2 सामने खेळले असून दोन्ही सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत तो सुपर 8 साठी सहज पात्र ठरू शकतो. यामध्ये इंग्लंडला धक्का बसू शकतो.

आता ड गटातून दक्षिण आफ्रिकेनेही आतापर्यंत खेळलेले दोन्ही सामने जिंकले आहेत आणि बांगलादेशनेही आतापर्यंत खेळलेला एकमेव सामना जिंकला आहे. अशा परिस्थितीत हे दोन्ही संघ सुपर-8 साठी पात्र ठरू शकतात.

म्हणजेच भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश हे 7 संघ सुपर-8 साठी पात्र ठरू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT