India vs Australia T20 World Cup 2024 Rain Weather Update sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Ind vs Aus Weather Update: मोठी अपडेट! भारत-ऑस्ट्रेलिया सामना होणार रद्द... मग कोणाला होणार फायदा? जाणून घ्या समीकरण

India vs Australia St. Lucia Rain Weather Updates : वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या सुपर-8 फेरीत आज भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एक अतिशय महत्त्वाचा सामना खेळला जाणार आहे.

Kiran Mahanavar

India vs Australia T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या सुपर-8 फेरीत आज भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एक अतिशय महत्त्वाचा सामना खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता ग्रोस आयलेट येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.

भारतीय संघाने उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा 21 धावांनी पराभव केला, त्यामुळे त्याच्यावर टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर होण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत कांगारू संघाला उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहायचे असेल, तर त्यांना हा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावाच लागेल.

पण याआधीच चाहत्यांसाठी एक वाईट बातमी येत आहे. हवामान खात्यानुसार, आज ग्रॉस आयलेटमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सेंट लुसियामध्ये कसे असेल हवामान? (AUS vs IND St. Lucia Weather updates)

दोन्ही संघांमधील हा सामना सेंट लुसिया येथील ग्रॉस आयलेट मैदानावर खेळला जाणार आहे. सामन्याच्या एक दिवस आधी रविवारी शहरात जोरदार पाऊस झाला आणि रात्री उशिराही पाऊस पडला आहे. हा सामना सेंट लुसिया वेळेनुसार सकाळी 10.30 वाजल्यापासून खेळला जाणार आहे, परंतु सकाळी पावसाचा व्यत्यय येऊ शकतो.

स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 च्या सुमारास पावसाची 51 टक्के शक्यता आहे. अशा परिस्थितीत बराच वेळ पाऊस पडल्यास सामना रद्द करावा लागू शकतो. असे झाले तर कोणत्या संघाचे जास्त नुकसान होईल आणि कोणत्या संघाला फायदा होईल, चला जाणून घेऊया….

सामना रद्द झाल्यास फायदा कोणाला?

सुपर-8 सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. अशा परिस्थितीत पाऊस किंवा अन्य कारणामुळे सामना रद्द करावा झाला. तर दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी 1 गुण दिला जाईल. अशा परिस्थितीत भारतीय संघ आपल्या गट-1 मध्ये 5 गुणांसह अव्वल स्थानावर असेल आणि उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित करेल.

पण एका गुणाने ऑस्ट्रेलिया अडचणीत येणार आहे. त्याचे एकूण गुण 3 होतील. अशा स्थितीत त्यांना अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्याच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. अफगाणिस्तानचा संघ हा सामना जिंकल्यास 4 गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश करेल.

त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ वर्ल्ड कपमधून बाहेर जाईल. या सामन्यात बांगलादेश संघाने अफगाणिस्तानला हरवले तर दोघेही बाहेर होतील. त्या स्थितीत ऑस्ट्रेलियन संघ ३ गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश करेल. त्या स्थितीत अफगाण संघ 2 गुणांसह बाहेर होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katraj Dairy Milk Price: कात्रज डेअरीच्या दूध दरात वाढ; दुग्धजन्य पदार्थही महागणार... किती पैसे मोजावे लागणार?

भारतीय संघाचे वर्तमान अन् भविष्य संकटात! एक, दोन नव्हे तर १३ खेळाडू जखमी; BCCI च्या गोटातून समोर आली धक्कादायक माहिती...

MPSC Exam 2024: राज्यसेवा परीक्षा २०२४ ची ‘एसआयटी’ चौकशी करा, गुणरत्न सदावर्ते यांची पत्रकार परिषदेत मागणी

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये FDAची मोठी कारवाई! ५ उद्योगांवर धाड; १,९४,५०,९२२ किंमतीचे तेल जप्त

Thane: ठाण्याच्या शाळेत धक्कादायक प्रकार, विद्यार्थ्याचा अमली पदार्थ सेवनाचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT