Team India Possible Playing 11 vs Bangladesh sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Ind vs Ban : कर्णधार रोहित घेणार मोठा निर्णय! बांगलादेशविरुद्ध 2 स्टार खेळाडूंची सुट्टी, जाणून घ्या Playing-11

Team India Possible Playing 11 vs Bangladesh : भारत आणि बांगलादेश यांच्यात आज अँटिग्वा सेंट लुसिया येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर सुपर 8 चा महत्त्वाचा सामना खेळला जाणार आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम चमकदार कामगिरी करत असतानाही कर्णधार रोहित शर्मा टेन्शनमध्ये दिसत आहे.

Kiran Mahanavar

T20 World Cup 2024 Super 8 India vs Bangladesh Playing 11 : भारत आणि बांगलादेश यांच्यात आज अँटिग्वा सेंट लुसिया येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर सुपर 8 चा महत्त्वाचा सामना खेळला जाणार आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम चमकदार कामगिरी करत असतानाही कर्णधार रोहित शर्मा टेन्शनमध्ये दिसत आहे.

याचे कारण संघाचे दोन प्रमुख अष्टपैलू शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांची आतापर्यंतची कामगिरी. अशा परिस्थितीत भारतीय संघ बांगलादेशविरुद्धच्या आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो आणि बेंचवर बसलेल्या युझवेंद्र चहल, यशस्वी जैस्वाल किंवा संजू सॅमसन यापैकी कोणालाही संधी दिऊ शकतो.

टीम इंडिया शिवम दुबेच्या जागी संजू सॅमसनला संधी देऊ शकते, तर जडेजाच्या जागी युझवेंद्र चहल फिरकी विभागाची जबाबदारी सांभाळू शकतो. संजू सॅमसनच्या रूपाने एका अतिरिक्त फलंदाजाचा समावेश करणे हा भारतीय संघासाठी योग्य निर्णय ठरू शकतो.

युझवेंद्र चहलच्या रूपाने मुख्य फिरकी गोलंदाज संघात सामील झाल्याने गोलंदाजी विभागही मजबूत होईल. कुलदीप यादवने शेवटच्या सामन्यात पुनरागमन केले आणि अक्षर पटेल मुख्य अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत दिसत आहे. अशा स्थितीत जडेजाची बाहेर जाणे निश्चित असल्याचे बोलले जात आहे.

शिवम दुबेची कामगिरीही या स्पर्धेत चांगली राहिलेली नाही. अमेरिकेविरुद्धच्या सामन्याशिवाय तो सर्वच बाबतीत फ्लॉप ठरला आहे. अशा परिस्थितीत संजू सॅमसन त्याच्या जागी टीम इंडियासाठी योग्य पर्याय ठरू शकतो. याशिवाय टीम इंडियाला आणखी एका खेळाडूला आजमावण्याची संधी मिळणार आहे. यशस्वी जैस्वालला सलामीवीर म्हणून खेळवून विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर हलवता येऊ शकते कारण विराट कोहली सलामीवीर म्हणून आतापर्यंत फ्लॉप ठरला आहे.

बांगलादेशविरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT