IND vs BAN Warm up T20 World Cup 2024 sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Ind vs Ban : अमेरिकेत टीम इंडियाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह... सराव सामन्यात रोहितबरोबर घडली धक्कादायक घटना; Video Viral

Fan Meets Captain Rohit Sharma at Ground : आसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी भारतीय क्रिकेट संघाने आपल्या मोहिमेला सुरुवात केली आहे.

Kiran Mahanavar

IND vs BAN Warm up T20 World Cup 2024 : आसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी भारतीय क्रिकेट संघाने आपल्या मोहिमेला सुरुवात केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 182 धावा केल्या आणि बांगलादेशचा 62 धावांनी पराभव केला.

पण अमेरिकेत टीम इंडियाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आपण सर्वांनी या मेगा इव्हेंटपूर्वी अनेकदा दहशतवादी हल्ल्यांच्या बातम्या ऐकल्या आहेत. यादरम्यान न्यू यॉर्कच्या नासाऊ क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जाणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या सराव सामन्यात एक मोठी घटना घडली.

खरंतर भारतीय क्रिकेट संघाचे चाहते जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत. विशेषतः रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे. ते सुरक्षेची कोणतीही परवा न करता मैदानावर घुसतात. अनेक आयपीएल मॅचेस आणि इंटरनॅशनल मॅचेसमध्ये आपण हे पाहिले आहे.

अशीच घटना आज भारत-बांगलादेश सामन्यातही पाहायला मिळाली. रोहित शर्माला भेटण्यासाठी एका चाहता अचानक मैदानात घुसला. पण अमेरिकन पोलिसांनी त्या चाहत्याला खाली पाडले. यादरम्यान रोहित शर्माने पोलिसांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी रोहितचे काही ऐकले नाही.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 182 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 20 षटकांत 9 गडी गमावून 121 धावा करू शकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kabaddi Player Murder : कब्बडीपटूची भरदिवसा हत्या! पोलिसांकडून आरोपीचं एन्काउंटर अन् एकास अटकही

Farmer Suicide : नापिकी अन् कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यानं विहिरीत उडी मारून संपवलं जीवन

Ravi Kishan Death Threat : ‘’चार दिवसांत बिहारला आलात की …’’ म्हणत, रवी किशन यांना जीवे मारण्याची धमकी!

Pro Kabaddi Final 2025: दबंग दिल्लीने मारली बाजी! पुणेरी पलटनला अटीतटीच्या लढतीत केले पराभूत, २ गुणांनी रोमहर्षक विजय

Shirur Accident : आरामबसची पुढे चाललेल्या मोटारीला धडक; दोन्ही बससह मोटारीतील १६ प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT