Ind Vs Eng T20 World Cup 2024 Semi Final sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs ENG : 'वर्ल्ड कपमधील सामने भारतीय संघाच्या मर्जीनुसार...' इंग्लंडच्या माजी कर्णधाराने ICCवर केला भेदभावाचा आरोप

अमेरिका येथील टी-२० विश्‍वकरंडकाचे आयोजन हे भारतीय संघासाठी हितकारक असेल याच दृष्टीने करण्यात आले आहे, मात्र ही स्पर्धा काही द्विपक्षीय मालिका नाही.

Kiran Mahanavar

Ind Vs Eng T20 World Cup 2024 : इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने टी-२० विश्‍वकरंडकाच्या वेळापत्रकासह एकूणच ढाच्यावर टीका केली. वेस्ट इंडीज व अमेरिका येथील टी-२० विश्‍वकरंडकाचे आयोजन हे भारतीय संघासाठी हितकारक असेल याच दृष्टीने करण्यात आले आहे, मात्र ही स्पर्धा काही द्विपक्षीय मालिका नाही. इतर देशांचाही आयसीसीकडून विचार व्हायला हवा होता. फक्त मिळत असलेल्या नफ्याकडे बघून चालत नाही.

यूट्यूबवरील एका पॉडकास्टदरम्यान दिलेल्या मुलाखतीत मायकेल वॉन म्हणाला, टी-२० विश्‍वकरंडकातील सामने भारतीय संघाच्या मर्जीनुसार खेळवण्यात आले. उपांत्य फेरीचा सामनाही कुठे खेळवण्यात येईल हे भारतीय संघाला माहीत होता. भारताचा प्रत्येक सामना भारतीय वेळेनुसार क्रिकेटप्रेमींना रात्री बघता येईल, असे नियोजन करण्यात आले. जेणेकरून टेलीव्हीजनवर जाहीरातींचा पाऊस पडेल. ही स्पर्धा जागतिक आहे याकडे आयसीसीने लक्ष द्यायला हवे होते, पण तसे झाले नाही.

क्रिकेटप्रेमींचा पाठिंबा

मायकेल वॉन नमूद करतो की, भारतातील क्रिकेटप्रेमींचा टीम इंडियावर विश्‍वास आहे. कागदावर हा संघ तगडा आहे. त्यामुळे भारतीय संघाने प्रकाशझोतातील सामना खेळायला हवा होता. गयानाशिवाय इतर ठिकाणीही त्यांनी लढत खेळायला हवी होती. गयाना येथे जून महिन्यात ३० पैकी २४ दिवस पाऊस पडतो. त्यामुळे येथे उपांत्य फेरीचा सामना ठेवूनही काही उपयोग नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT