Jasprit-Bumrah 
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs PAK: पाकविरूद्ध बुमराहला खुणावतोय 'हा' मोठा विक्रम!

India vs Pakistan: भारतीय संघ आतापर्यंत टी२० वर्ल्डकपमध्ये पाकविरूद्ध अजिंक्य

विराज भागवत

India vs Pakistan: भारतीय संघ आतापर्यंत टी२० वर्ल्डकपमध्ये पाकविरूद्ध अजिंक्य

India vs Pakistan T20 World Cup 2021: भारतीय संघाच्या (Team India) टी२० विश्वचषक २०२१च्या (T20 World Cup 2021) प्रवासाला आजपासून सुरूवात होणार आहे. भारत विरूद्ध पाकिस्तान (Ind vs Pak) या सामन्याना आज दुबईमध्ये (Dubai) खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी भारताने दोन सराव सामने खेळले. या दोन सामन्यात भारताने आधी इंग्लंड (England) आणि नंतर ऑस्ट्रेलिया (Australia) अशा दोन तुल्यबळ संघांना धूळ चारली. असं असलं तरी भारत-पाक सामन्याचे दडपण (High Voltage Drama) हे वेगळंच असतं. त्यामुळे या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष आहे. या टी२० स्पर्धेत आणि खासकरून आजच्या सामन्यात भारताचा जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला एक विक्रम खुणावतोय. (IND vs PAK in T20 World Cup Jasprit Bumrah 5 Wickets away to become Leading Wicket Taker from Team India)

भारत विरूद्ध पाकिस्तान या सामन्यात भारताकडून सर्वच खेळाडूंनी चांगली कामगिरी करणं अपेक्षित आहे. भारताने आतापर्यंत पाच वेळा टी२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा सामना केला आहे. विशेष म्हणजे या पाचही वेळा भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चाखायला भाग पाडले आहे. आजच्या सामन्यातही तशाच प्रकारच्या कामगिरीची भारतीय फॅन्सना अपेक्षा आहे. यात भारताचा जसप्रीत बुमराह याची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. बुमराहचे सध्या आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ५९ बळी आहेत. त्याने आणखी पाच बळी घेतल्यास तो भारताचा सर्वाधिक यशस्वी टी२० गोलंदाज ठरू शकतो. आताच्या घडीला, भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहल ६३ बळींसह अव्वल स्थान आहे.

दरम्यान, भारतीय संघाने आपला अंतिम संघ अद्याप जाहीर केलेला नाही. टॉसच्या वेळी विराट कोहली आपलं Playing XI जाहीर करणार आहे. मात्र, आपला संघ समतोल असेल असं त्याने सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. याउलट, पाकिस्तानच्या संघाने कालच भारताविरूद्धच्या सामन्यासाठी १२ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. त्यातील ११ खेळाडूंसोबत पाकिस्तानचा संघ मैदानात उतरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

SCROLL FOR NEXT