India vs Pakistan T20 World Cup 2024 Latest News sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Ind vs Pak T20 World Cup: भारत-पाकिस्तान मॅच पार्किंगचे तिकीट दर माहितीयेत का? डोक्याला हात लावून म्हणाल, उगीच घेतली गाडी...

India vs Pakistan World Cup 2024: टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये पाकिस्तानचा सामना करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

Kiran Mahanavar

India vs Pakistan T20 World Cup 2024: टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये पाकिस्तानचा सामना करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा ब्लॉकबस्टर सामना होणार आहे. उभय संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

भारत-पाकिस्तान सामन्याची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. कारण दोन्ही संघ फक्त आयसीसी इव्हेंटमध्ये आमनेसामने येतात. या सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. पण तसेच न्यूयॉर्कमध्ये पार्किंगच्या किंमतीही गगनाला भिडल्या आहेत. या सामन्यासाठी पार्किंग शुल्क 1200 डॉलर आहे. भारतीय रुपयानुसार जवळपास एक लाख रुपये आहे.

टीम इंडियाचा माजी क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धूने भारत-आयर्लंड सामन्यात कॉमेंट्री करताना ही माहिती दिली. हा प्रकार त्यांच्या ड्रायव्हरने सिद्धूला सांगितला.

खराब राजकीय आणि राजनैतिक संबंधांमुळे 2012 पासून भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाही. दोन्ही संघ फक्त आशिया कप किंवा आयसीसी स्पर्धेत भाग घेतात. क्रिकेट वर्ल्ड कप 2023 मध्येही या दोघांमध्ये सामना झाला होता.

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत एकूण सात सामने झाले आहेत. त्यापैकी भारतीय संघाने 6 सामने जिंकले आहेत. पाकिस्तानला एक सामना जिंकण्यात यश आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT