KL-Rahul-Clean-Bowled 
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs PAK Video: आफ्रिदीने उडवला केएल राहुलचा क्लीन बोल्ड!

चेंडू अचानक आत वळला अन् राहुलला काहीही कळलंच नाही...

विराज भागवत

चेंडू अचानक आत वळला अन् राहुलला काहीही कळलंच नाही...

India vs Pakistan, T20 World Cup 2021: भारताचा (Team India) सध्या टी२० वर्ल्ड कपमधील सलामीचा सामना पाकिस्तान (Pakistan) विरोधात सुरू आहे. या सामन्यात भारताच्या डावाची (Ind vs Pak) सुरूवात खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) इनस्विंग झालेल्या पहिल्याच चेंडूवर पायचीत झाला. त्याला शून्यावर बाद व्हावे लागले. त्यानंतर केएल राहुल (KL Rahul) दमदार फलंदाजी करेल अशी आशा होती. पण शाहीन आफ्रिदीच्या अतिशय वेगवान आणि इनस्विंग होणाऱ्या चेंडूवर तो बाद झाला. (IND vs PAK Video KL Rahul bowled by Shaheen Afridi beauty of swing Bowling T20 World Cup 2021)

शाहीद आफ्रिदीने दुसऱ्या षटकात राहुलला गोलंदाजी टाकण्यास सुरूवात केली. त्यावेळी एक चेंडू टप्पा पडताक्षणीच पटकन आतल्या बाजूला वळला. राहुलला काहीही कळण्याआधीच चेंडू त्याच्या बॅट आणि पायाच्या मधून थेट स्टंपवर आदळला आणि त्याला त्रिफळाचीत होण्याची वेळ आली.

पाहा व्हिडीओ-

दरम्यान, भारतीय संघाचा पहिला सराव सामना इंग्लंडविरोधात होता. त्यावेळी इशान किशनने नाबाद ७० धावांची दमदार खेळी केली होती. पण आजच्या सामन्यात त्याला संधी देण्यात आली नाही. त्यासोबत भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यालाही संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. युवा वरूण चक्रवर्ती याला संघात स्थान दिले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गोलंदाजीबाबत साशंकता असूनही हार्दिक पांड्याला संघात स्थान मिळाले आहेत आणि शार्दूल ठाकूरला संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Provident Fund : घरबसल्या 1 मिनिटात तपासा आपला PF बॅलन्स! जाणून घ्या EPFO पासबुक पाहण्याचे सोपे, जलद मार्ग आणि नवीन सुविधा

Latur Crime : हातपाय बांधून जिवंत जाळलं! चार तास जळत राहिली कार, तडफडून तडफडून तरुणाचा अंत; अनैतिक संबंधातून क्रूर कृत्य?

IND vs SA 4th T20I : शुभमन गिल OUT, तीन खेळाडूंची एन्ट्री? चौथ्या ट्वेंटी-२० साठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये बदल

"स्त्री सशक्तीकरण म्हणायचं आणि कारस्थान करणाऱ्या बायका दाखवायच्या" रेणुका शहाणेंनी मालिकांवर ओढले ताशेरे

Pune : नवले पुलावर पुन्हा अपघात, ट्रकचा ब्रेक झाला फेल

SCROLL FOR NEXT