Virat Kohli | T20 World Cup 2024 Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs PAK: विराट कोहलीचं पाकिस्तानविरुद्ध असं पहिल्यांदाच झालं; टी20 वर्ल्ड कपमध्ये 12 वर्षांपासून...

Virat Kohli: टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्ध खेळताना भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या बाबती एक गोष्ट पहिल्यांदाच घडली.

Pranali Kodre

T20 World Cup 2024, Virat Kohli: भारत विरुद्ध पाकिस्तान संघात रविवारी (9 जून) टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सामना पार पडला. न्युयॉर्कमधील नसाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने सुरुवातीच्या विकेट्स लवकर गमावल्या. यात स्टार फलंदाज विराट कोहलीच्या विकेटचाही समावेश आहे.

या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. पावसाचा सातत्याने व्यत्यय येत असलेल्या या सामन्यात भारताकडून कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली सलामीला फलंदाजीला उतरला.

मात्र, दुसऱ्या षटकात विराटला नसीम शाहने 4 धावांवर बाद केले. विराटचा झेल उस्मान खानने घेतला. त्यामुळे टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात असं पहिल्यांदाच झालं की विराट पाकिस्तानविरुद्ध एकेरी धावसंख्येवर बाद झाला.

याआधी तो 5 वेळा टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळला आहे. यातील चार वेळा त्याने अर्धशतक झळकावलं आहे, तर एकदा त्याने 30 धावांचा टप्पा पार केला आहे.

इतकेच नाही, तर टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच विराट सलग दोन सामन्यांत एकेरी धावसंख्येवर बाद झाला आहे. यापूर्वी आयर्लंडविरुद्ध 5 जून रोजी झालेल्या सामन्यात विराट 1 धावेवर बाद झाला होता.

टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध विराटची कामगिरी

  • 2012 - नाबाद 78 धावा, कोलंबो

  • 2014 - नाबाद 36 धावा, मीरपूर

  • 2016 - नाबाद 55 धावा, कोलकाता

  • 2021 - 57 धावा, दुबई

  • 2022 - नाबाद 84 धावा, मेलबर्न

  • 2024 - 4 धावा, न्युयॉर्क

दरम्यान, विराट बाद झाल्यानंतर रोहित शर्माही झटपट बाद झाला होता. त्यानेही 13 धावा केल्या, त्याला शाहिन आफ्रिदीने बाद केले.

विराटची टी20 वर्ल्ड कपमधील कामगिरी

विराटने 2012 सालापासून झालेले सर्व टी20 वर्ल्ड कप खेळले आहेत. तो टी20 वर्ल्ड कपमधील सर्वात यशस्वी फलंदाजही आहे. त्याने टी20 वर्ल्ड कपमध्ये आत्तापर्यंत 29 सामन्यांत खेळताना 71.62 च्या सरासरीने 1146 धावा केल्या आहेत. यात 14 अर्धशतकांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT