IND vs SA T20 World Cup 2024 Final Weather Forecast sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 WC 24 Final : बार्बाडोसमधून मोठी अपडेट! IND vs SA फायनल सामना होणार रद्द? इतक्या टक्के आहे पावसाची शक्यता

IND vs SA T20 World Cup 2024 Final Weather Forecast : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 वर्ल्ड कप 2024 चा अंतिम सामना 29 जून रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता बार्बाडोस येथे खेळला जाणार आहे.

Kiran Mahanavar

India vs South Africa T20 World Cup 2024 Final Barbados Weather Forecast : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 वर्ल्ड कप 2024 चा अंतिम सामना 29 जून रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता बार्बाडोस येथे खेळला जाणार आहे. एकीकडे टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये इंग्लंडला हरवून फायनलमध्ये धडक मारली आहे, तर दुसरीकडे टीम दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला हरवून फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

आता हे दोन्ही संघ प्रथमच वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. उपांत्य फेरीप्रमाणेच अंतिम सामन्यावरही पावसाचे सावट आहे. अंतिम सामन्याच्या दिवशी बार्बाडोसमधील हवामानाबाबत एक मोठी अपडेट समोर आले आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे होणार आहे. त्याचबरोबर या सामन्यावरही पावसाचे सावट दिसत आहे. Weather.com नुसार, 29 जून रोजी बार्बाडोसमध्ये जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. सामन्यादरम्यान पावसाची शक्यता 70 टक्क्यांपर्यंत आहे. त्यानंतर चाहत्यांना पुन्हा एकदा पावसाने व्यत्यय आलेला सामना पाहायला मिळेल.

फायनलसाठी राखीव दिवस

आयसीसीने अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवला आहे. 29 जूनचा सामना पावसामुळे रद्द झाला तर 30 जूनला अंतिम सामना खेळला जाईल. याशिवाय अंतिम सामन्यासाठी 190 मिनिटांचा अतिरिक्त वेळही ठेवण्यात आला आहे. असे असतानाही राखीव दिवशीही पावसामुळे सामना रद्द झाल्यास भारत आणि दक्षिण आफ्रिका यांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.

टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये दोन्ही संघ अजिंक्य

यावेळी दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये एकही सामना गमावलेला नाही. दक्षिण आफ्रिकेने 8 सामने खेळले आहेत, तर टीम इंडियाने 7 सामने खेळले आहेत. टीम इंडियाचा एक सामनाही पावसामुळे गमवावा लागला. टीम इंडियाने तिसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेला वर्ल्ड कपच्या सुरुवातीपासून प्रथमच अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात यश आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT