Team India Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup: दोन वर्षात भारताला पुन्हा T20 चॅम्पियन बनण्याची संधी! कधी आणि कुठे खेळला जाणार पुढचा वर्ल्ड कप?

T20 World Cup 2026: दोन वर्षांनी म्हणजेच २०२६ मध्ये १० वा टी२० वर्ल्ड कप खेळला जाणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

T20 World Cup 2026: भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. शनिवारी (२९ जून) बार्बाडोसला झालेल्या अंतिम सामन्यात शेवटच्या चेंडूवर भारताने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली.

यंदा टी-२० वर्ल्ड कपचे नववे पर्व होते. याचे संयुक्तपणे आयोजन अमेरिका आणि वेस्टइंडीज यांनी केले होते. आता दोन वर्षांनी टी-२० वर्ल्ड कप खेळला जाईल, तर याचे आयोजन भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे करणार आहे.

एकूणच काय तर घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळणार असल्याने पुन्हा एकदा भारतीय संघाला चॅम्पियन होण्याची शक्यता आहे. आगामी टी20 वर्ल्ड कप हे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये असणार आहे.

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जेतेपदावर आपले नाव कोरले. वर्ल्ड कप 2026मध्ये यंदाच्या स्पर्धेतील सुपर-८ मध्ये पोहोचलेले संघ पात्र ठरले आहे. यामध्ये भारत आणि श्रीलंकासुद्धा यजमान म्हणून सामील आहेत. टी-२० वर्ल्ड कपच्या दहाव्या पर्वात देखील २० संघ असणार असून एकूण ५५ सामने खेळवण्यात येणार आहे.

अमेरिकासुद्धा पुढचा टी-२० वर्ल्ड कप खेळणार

अमेरिकेने टी-२० वर्ल्ड कपमध्ये कमालीचे प्रदर्शन दाखवले आहे. सुपर-8 मध्ये पोहोचल्याने, ते दोन वर्षांनी पुन्हा टी२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. मोनांक पटेलच्या नेतृत्वाखाली अमेरिका संघाने या वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानसारख्या संघाला पराभूत केले.

पहिला सामना कधी आणि कुठे खेळवला जाईल याचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. पुढील विश्वचषकात भारत आपला नवा संघ पाठवणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा त्या संघात नसणार, या खेळाडूंनी टी-२० वर्ल्डकप २०२४ नंतर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

२०२६ च्या वर्ल्डकपसाठी पात्र ठरलेले संघ

भारत, श्रीलंका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि आयर्लंड हे आगामी टी२० वर्ल्डकप २०२६ साठी पात्र ठरले आहे. याव्यतिरिक्त पात्रता स्पर्धेतून बाकी संघ निश्चित होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT