Team India | Practice Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup: पहिल्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा जोरदार सराव, विराटनेही गाळला घाम; BCCI ने शेअर केला Video

Team India Practice: भारतीय क्रिकेट संघाची टी20 वर्ल्ड कपमधील मोहिम बुधवारी सुरू होणार असून त्याआधी खेळाडूंनी जोरदार सराव केला. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

Pranali Kodre

India Cricket Team:वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे यंदा टी20 वर्ल्ड कपचे नववे पर्व खेळवले जात आहे. या स्पर्धेत भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात आयर्लंडविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. भारत आणि आयर्लंड संघात बुधवारी (5 जून) हा सामना होणार आहे.

भारत आणि आयर्लंड संघ न्युयॉर्कमधील नव्याने बांधण्यात आलेल्या नसाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल. या सामन्यापूर्वी भारतीय संघ जोरदार सराव करताना दिसला आहे. बीसीसीआयने भारतीय संघाच्या सरावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये भारतीय संघातील सर्व खेळाडू मैदानात घाम गाळताना दिसत आहेत. यामध्ये दिसते की मुख्य संघातील 15 खेळाडूच नाही, तर राखीव खेळाडूंमध्ये असलेले शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान या खेळाडूंनीही मेहनत घेतल्याचे दिसले आहे.

तसेच विराट कोहलीनेही या सराव सत्रात सहभाग घेतल्याचे दिसले. विराट भारतीय संघात सर्वात शेवटी सहाभागी झालेला होता. त्यामुळे तो बांगलादेशविरुद्ध सराव सामनाही खेळला नव्हता. मात्र, त्यानंतर तोही भारतीय संघासह सराव सत्रादरम्यान नेट्समध्ये घाम गाळताना दिसला.

याशिवाय रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज असे अनेक खेळाडूही नेट्समध्ये सराव करताना दिसत आहेत.

दरम्यान, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की सध्या स्पर्धेतील सामने सुरु असल्याने सरावासाठी न्युयॉर्कमध्ये काँटिगे पार्कमध्ये सरावाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबत बोलताना द्रविड म्हणाला हे जरा विचित्र आहे की आम्ही पल्बिक पार्कमध्ये सराव करत आहोत.

भारताला पहिल्या फेरीतील पहिले तीन सामने न्युयॉर्कमध्ये खेळायचे आहेत, तर अखेरचा सामना फ्लोरिडाला होणार आहे. दरम्यान बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान सामनाही 9 जून रोजी न्यूयॉर्कलाच पार पडणार आहे.

  • टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

  • राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT