Team India Victory Parade Mumbai  sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Team India Victory Parade Mumbai : मुंबईतील अनेक मार्गांवरील वाहतूक वळवली, कडक सुरक्षेत निघणार टीम इंडियाची विजयी मिरवणूक

वर्ल्ड कप विजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या विजयी मिरवणुक ४ जुलै रोजी एनसीपीए ते वानखेडे स्टेडियमपर्यंत पर्यंत काढण्यात येणार आहे.

Kiran Mahanavar

Team India Victory Parade Mumbai : वर्ल्ड कप विजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या विजयी मिरवणुक ४ जुलै रोजी एनसीपीए ते वानखेडे स्टेडियमपर्यंत पर्यंत काढण्यात येणार आहे. यामुळे दुपारी ३ ते रात्री ९ या वेळेत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहन चालकांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आपल्या प्रवासाच्या मार्गाचे नियोजन करावे असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

गुरुवारी संध्याकाळी मुंबईत होणाऱ्या T20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या रोड शोसाठी पोलिसांनी विस्तृत सुरक्षा व्यवस्था केली आहे. खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने जमतील अशी अपेक्षा आहे. वर्ल्ड चॅम्पियन संघ खुल्या बसमधून रोड शोमध्ये भाग घेईल आणि त्यानंतर दक्षिण मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सत्कार समारंभ होईल.

यादरम्यान, वाहन चालकांनी चर्चगेट मार्गे एम. के. रोड, मेट्रो जंक्शन ते प्रिन्सेस स्ट्रीट या पर्यायी मार्गाचा वापर उत्तर वाहिनी वरील प्रवासासाठी करावा. वानखेडे स्टेडियमच्या दिशेने दक्षिणेकडे जाणाऱ्या मार्गावर सुद्धा वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस चोख बंदोबस्त घेत आहेत. अनेक मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. विजय परेडच्या पार्श्वभूमीवर हा संपूर्ण मार्ग सील करण्यात आला आहे.

१४ वर्षांपूर्वी एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेत २००७ च्या पहिल्या टी २०विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला नमवले होते तेव्हा याच मार्गावर असाच रोड शो आयोजित करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तीस्ता नदी प्रकल्पावरून भारत-चीनमध्ये नवा संघर्ष! चिकन नेकजवळ हालचाली वाढल्या; भारताच्या चिंतेवर ड्रॅगनचं मोठं प्रत्युत्तर

Heavy Rain in Pune Ghats: पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाची जोरदार हजेरी ; भिरा येथे विक्रमी ४०७ मिमी पावसाची नोंद

GBS Virus: कोरोना महामारीनंतर 'जीबीएस'चं संकट, पनवेलमध्ये दोन रुग्ण पॉसिटीव्ह; नेमका आजार काय?

Social Harmony: धर्मापलीकडची माणुसकी! मुस्लिम युवकाच्या वडाची वटसावित्रीला पूजा, गंगापूरमधील वटसावित्री उत्सव ठरला प्रेरणादायी..

महाराष्ट्रातील आरोग्य विभागात ५,२२३ नव्या पदांची मेगाभरती! अनेक जिल्ह्यांतील रुग्णालयांमध्ये जागा भरणार; कुठे आणि कधी?

SCROLL FOR NEXT