Modi vs Owaisi  sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

...तरीही भारत-पाक सामना होणार? ओवैसींचा थेट PM मोदींना प्रश्न

असद्दुीन ओवैसी यांनी वर्ल्ड कपमध्ये नियोजित भारत-पाकिस्तान लढतीला विरोध दर्शवला आहे.

सुशांत जाधव

एआयएमआयएमचे (AIMIM) प्रमुख आणि खासदार असद्दुीन ओवैसी यांनी टी-20 वर्ल्ड कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीला विरोध दर्शवला आहे. असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी पाकिस्तान (Pakistan), चीन (China) यांची घुसघोरी आणि इंधन दरवाढीच्या मुद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर हल्लाबोल केला. हैदराबाद येथील एका सभेतील आपल्या भाषणात त्यांनी मोदींवर गंभीर आरोप केले आहेत.

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानात घुसण्याची भाषा करणारे नरेंद्र मोदी चीनच्या घुसघोरीवर मौन बाळगून आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला. पेट्रोलची सेंच्युरी झाली. डिझेलचे भाव 70 पेक्षा अधिक झाले. पतंप्रधान मोदी या मुद्यावर काहीही बोलायला तयार नाहीत. चीनी आपल्या घरात घुसले आहेत. ज्यावेळी पुलवामा हल्ला झाला त्यावेळी मोदींनी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची भाषा केली. आम्ही त्यांना पाठिंबा दिला. आता चीनी आपल्या देशात घुसखोरी करत आहेत. पण मोदी यावर काहीही बोलायला तयार नाहीत. भारताचे वजीरे आझम चीन विरुद्ध बोलायला घाबरतात, असेही असद्दुीन ओवैसी यावेळी म्हणाले.

आपल्या या भाषणात त्यांनी 24 आक्टोबरला रंगणाऱ्या भारत-पाकिस्तान यांच्यातील टी-20 लढतीचा उल्लेखही केला. देशाचे 9 जवान शहिद झाले असतानाही वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होणार का? असा प्रश्न त्यांनी पंतप्रधान मोंदीना विचारला. पाकिस्तानवाले जम्मू काश्मीरमधील जनतेच्या जीवाशी टी-20 खेळत असताना आपण वर्ल्ड कपमध्ये त्यांच्यासोबत टी-20 चा सामना खेळायचा का? असा संतप्त सवाल उपस्थितीत करत असद्दुीन ओवैसी यांनी वर्ल्ड कपमध्ये नियोजित भारत-पाकिस्तान लढतीला विरोध दर्शवला आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका आधीच स्थगित आहेत. दहशतवादाच्या मुद्यावरच भारत सरकारने पाकिस्तानसोबत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पण आयसीसीच्या स्पर्धेत दोन्ही देश समोरासमोर येत असतात. पुन्हा एकदा यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात लढत रंगणार आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमध्ये केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान विरुद्ध वातावरण तापले आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 9 भारतीय जवान शहिद झाले आहेत. याच्या निषेधार्थ ट्विटर वर #ban_pak_cricket (बॅन_पाक_क्रिकेट) ट्रेंड च्या माध्यमातून भारत पाकिस्तान सामन्याला विरोध दर्शवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan: आज शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2,000 रुपये! किती वाजता जमा होणार 24वा हप्ता? पैसे आले की नाही? मोबाईलवर असे चेक करा

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध चौथा T20 आज; अभिषेक शर्मा पुन्हा चर्चेत, Playing 11 मध्ये मोठे बदल होणार? कोण IN, कोण OUT; सामना कुठे पाहाल?

Maharashtra SIR Deadline : महाराष्ट्रात SIR ची मुदत १३ नोव्हेंबरपर्यंत वाढवली; सुप्रीम कोर्टाने फटकारताच निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates : जोरदार बर्फवृष्टीमुळे केदारनाथमधील तापमानात मोठी घट

“असं अचानक कोणाला काढून टाकणं योग्य नाही”; लीना-मंगेश प्रकरणावर वंदना गुप्तेंनी मांडली स्पष्ट भूमिका, म्हणाल्या...'आजकालची मुलं...'

SCROLL FOR NEXT