Team India Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup: टीम इंडिया आयर्लंडविरुद्धच्या सामन्यातून करणार मोहिमेला सुरुवात, पहिल्या सामन्यासाठी कशी असेल प्लेइंग-11?

India vs Ireland: टी20 वर्ल्डकपमधील भारतीय संघ पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळू शकते, याचा घेतलेला आढावा.

Pranali Kodre

India's Predicted Playing XI: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला सुरुवात झाली असून भारताला पहिला सामना आयर्लंड विरुद्ध खेळायचा आहे. हा सामना बुधवारी (5 जून) न्युयॉर्कमधील नसाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता खेळवला जाणार आहे.

या सामन्यासाठी भारताचे प्लेइंग इलेव्हनमधील संयोजन कसे असणार याबाबत बरीच चर्चा झाली आहे. दरम्यान, सर्वात जास्त चर्चा ही सलामीला कोण फलंदाजी करणार यावर झाली आहे. सध्या यासाठी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांचा पर्याय आहे.

दरम्यान, भारतीय संघव्यवस्थापन रोहितसह विराटला सलामीला संधी देण्याची शक्यता आहे. विराट सराव सामन्यात खेळला नसला तरी आयपीएल 2024 मधील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने 700 हून अधिक धावा केल्या होत्या. तसेच त्याने आयपीएलला सलामीला फलंदाजी देखील केली आहे.

तसेच जर रोहित आणि विराट हे दोन्ही उजव्या हाताने फलंदाजी करणारे खेळाडू असले तरी नंतर ऋषभ पंत, शिवम दुबे आणि रविंद्र जडेजा हे डावखुरे फलंदाज संघात असू शकतात.

त्यामुळे सध्या तरी प्लेइंग इलेव्हनमध्ये यशस्वी जैस्वालला संधी दिली जाण्याची शक्यता कमी आहे. जैस्वालऐवजी संजू सॅमसनला फलंदाज म्हणून आधी प्राधान्य दिले जाऊ शकते, तो देखील गेल्या काही महिन्यांत चांगल्या फॉर्ममध्ये खेळत होता.

तसेच मधल्या फळीत सॅमसनसह सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत यांनाही संधी मिळू शकते. पंत यष्टीरक्षणही करू शकतो. त्याचबरोबर शिवम दुबेने बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात फलंदाजीत चमक दाखवली नसली, तरी त्याने गोलंदाजीत प्रभावी कामगिरी केली होती. त्यामुळे त्यालाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते.

तसेच उपकर्णधार आणि अष्टपैलू हार्दिक पांड्याही संघात असेल, तर रविंद्र जडेजाही प्लेइंग इलेव्हनमध्ये असू शकतो. दरम्यान शिवम आणि हार्दिक हे दोघेही वेगवान गोलंदाजीही करू शकत असल्याने भारताला जडेजासह आणखी एका फिरकीपटूला खेळण्याची संधी मिळू शकते.

फिरकीपटू म्हणून युजवेंद्र चहलआधी कुलदीप यादवला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. तसेच प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसह अर्शदीप सिंगला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. तो डावखुरा गोलंदाज असून त्याची सराव सामन्यातही चांगली कामगिरी झाली होती. असे झाल्यास मोहम्मद सिराजला बाहेर बसावे लागू शकते.

आयर्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी भारताची प्लेइंग-11

  • रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, मोहम्मद सिराज/अर्शदीप, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

SCROLL FOR NEXT