IND-vs-NZ sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

INDvsNZ : भारत-न्यूझीलंड संघाविरुद्ध हरला तर...

दोन्ही संघांसाठी हा महत्वाचा सामना असणार

Kiran Mahanavar

T-20 विश्वकपमध्ये आज भारत आणि न्यूझीलँड आमने-सामने आहेत. दोन्ही संघांसाठी हा महत्वाचा सामना असणार आहे. भारताने पाकिस्तानसोबतचा पहिलाच सामना वाईट पद्धतीने हरला आहे. कप्तान विराट कोहली याने म्हटलंय की, विश्वकपमध्ये या पुढील सामन्यांमध्ये मागील सामन्यातील झालेल्या चुका सुधारल्या जातील. दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात भारताचा संघ 10 विकेटने हरला आणि पाकिस्तानने एक नवा इतिहास रचला. विश्वकपमध्ये पाकिस्तानने भारताला पहिल्यांदाच हरवले आहे.

गट 2 मधील न्यूझीलंड आणि भारत या दोन्ही संघांनी पाकिस्तानकडून पहिला सामना हरला आहे आणि आता एकमेकांना पराभूत केल्याशिवाय उपांत्य फेरी गाठणे त्यांच्यासाठी जवळजवळ अशक्य आहे. पाकिस्तानने या गटात भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानसोबत तीन सामने खेळले असून तीनही सामने जिंकले आहेत. पाकिस्तानने गट २ मध्ये अव्वल स्थान गाठून उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. दोन गटातील दोनच संघ अंतिम फेरीत जाणार आहेत. अशा स्थितीत आता एकच संघची जागा शिल्लक आहे. भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आज उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी धडपड करणार आहेत.

पॉइंट टेबलचा खेळ

भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ मजबूत आहेत आणि मोठ्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. या दोन्ही संघांनी अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियावर विजय मिळवला असे गृहीत धरले तरी दोन्ही संघांचे ६-६ गुण होतील. आजच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला हरवले तर त्याचे एकूण आठ गुण होतील आणि न्यूझीलंडचे सहा गुण राहतील. त्यानंतर उपांत्य फेरीतील पाकिस्तान आणि भारताचे स्थान निश्चित होईल. या सामन्यात न्यूझीलंडने भारताला हरवले तर न्यूझीलंडचे आठ गुण होतील आणि भारताचे सहा गुण राहतील.

अशा प्रकारे पाकिस्तान आणि न्यूझीलंड उपांत्य फेरीत प्रवेश करतील. मात्र, भारत आणि न्यूझीलंड या दोघांनी अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाला पराभूत केल्यावरच ही समीकरणे कामी येतील. परंतु, खेळामध्ये काहीही निश्चित नसल्यामुळे, काहीही घडण्याची शक्यता नेहमीच खुली असते. अफगाणिस्तानने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कडवी झुंज दिली असून शेवटपर्यंत सामन्यात टिकून राहण्यासाठी तो लढाऊ संघ म्हणून समोर आला आहे. अफगाणिस्तानचा संघ हा न्यूझीलंड आणि भारतासाठीही आव्हान बनू शकतो.

पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर भारत आता केवळ त्याच्या कामगिरीवर अवलंबून नाही, तर कोणता संघ कोणाला पराभूत करतो यावर त्याचे भवितव्य अवलंबून आहे. सुपर 12 टप्प्यात दोन संघांनी गुणांची बरोबरी केली तर उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करावा लागेल. यामध्ये नेट रन रेट महत्त्वाची भूमिका बजावेल. भारत आणि न्यूझीलंडचे सामने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबिया सोबतही होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT