India Vs Bangladesh T20 World Cup 2024  esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs BAN Playing 11 : भारत बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात बुमराहला देणार विश्रांती, रोहित प्लेईंग 11 मध्ये करणार किती बदल?

अनिरुद्ध संकपाळ

India Vs Bangladesh T20 World Cup 2024 : भारताने सुपर 8 मधील आपल्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा सहज पराभव केला. या सामन्यानंतर एका दिवसाच्या अंतराने लगेच टीम इंडिया बांगलादेशविरूद्ध खेळणार आहे. अफगाणिस्तानविरूद्धचा सामना झाल्या झाल्या भारतीय संघ त्याच दिवशी बांगलादेशविरूद्धचा सामना खेळण्यासाठी अँटिग्वाला रवाना झाला.

भारतीय संघ सुपर 8 सामने आणि बाद फेरीदरम्यान 9 दिवसात 5 सामने खेळणार आहे. त्यामुळे संघाला सतत प्रवास करावा लागणार आहे. यामुळे टीम इंडियाला आपल्या प्लेईंग 11 मध्ये बदल करावा लागण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात काही खेळाडूंना विश्रांती देखील देण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियाने अँटिग्वामध्ये झालेल्या त्यांच्या बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात चार वेगवान गोलंदाज खेळवले होते. भारतीय संघ देखील याच रणनितीने बांगलादेशविरूद्ध उतरणार की जसप्रीत बुमराहला विश्रांती देत त्याला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यासाठी वाचवून ठेवणार हे पहावे लागेल.

आतापर्यंत अँटिग्वामध्ये झालेल्या सामन्यांवरून तेथील खेळपट्टी ही फलंदाजीला पोषक असल्याचे दिसून येते. तेथे फिरकीला तशी साथ मिळालेली नाही. त्यामुळे या मैदानावर धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही गोष्ट लक्षात घेत रोहित शर्मा कुलदीप यादव ऐवजी मोहम्मद सिराजला खेळवण्याची शक्यता आहे जर वर्कलोडचा विचार केला तर जसप्रीत बुमराहला विश्रांती देऊन त्याच्या जागी सिराजची संघात वर्णी लागू शकते.

मोहम्मद सिराज संघात परतणार?

भारताने बारबाडोसमधील सामन्यात सिराजच्या ऐवज कुदलीप यादवला खेळवले होते. त्याने 32 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. मात्र आता जर अँटिग्वामधील खेळपट्टी फिरकीला साथ देणारी नसेल तर कुलदीप पुन्हा बेंचवर बसू शकतो. त्याच्या ऐवजी मोहम्मद सिराज पुन्हा संघात येऊ शकतो.

याबाबत रोहित म्हणतो की, 'आम्हाला माहिती आहे की जसप्रीत बुमराह हा वर्ल्ड क्लास बॉलर आहे. तो काय करू शकतो हे आम्हाला माहिती आहे. आम्ही परिस्थिती पाहून त्याचा स्मार्ट वापर करणे महत्वाचे आहे. तो जबाबदारी घेऊन खेळतोय. तो हे अनेक वर्षांपासून करतोय.

आम्ही खेळपट्टी, विरोधी संघ यांचा आढावा घेऊन त्या पद्धतीने संघात बदल करण्यास इच्छुक आहोत. आम्हाला वाटलं की पुढच्या सामन्यात वेगवान गोलंदाजांना पोषक खेळपट्टी आहे तर आम्ही वेगवान गोलंदाजांसोबत जाऊ.'

बुमराहने अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात 4 षटकात 7 धावा देत 3 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र सोमवारी होणाऱ्या भारत ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी त्याला वाचवून ठेवावं लागेल. भारतीय संघ 96 तासात 3 सामने खेळणार आहे. जर भारत सेमी फायनल आणि फायनलला पात्र झाला तर भारतीय संघ 9 दिवसात 5 सामने खेळेल.

भारताची बांगलादेशविरूद्धची संभाव्य प्लेईंग 11

1. रोहित शर्मा (C)

2. विराट कोहली

3. ऋषभ पंत (WK)

4. सूर्यकुमार यादव

5. शिवम दुबे

6. हार्दिक पंड्या

7. रवींद्र जडेजा

8. अक्षर पटेल

9. कुलदीप यादव

10. अर्शदीप सिंग

11. जसप्रीत बुमराह/ मोहम्मद सिराज

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT