India vs Canada Match | T20 World Cup 2024  Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup, IND vs CAN: भारत-कॅनडा सामना पावसामुळे रद्द, दोन्हीही संघांना मिळणार पाँइंट्स

India vs Canada T20 World cup 2024 LIVE score updates: टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि कॅनडा यांच्यातील फ्लोरिडाला होणारा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे.

Pranali Kodre

T20 WC, India vs Canada:

फ्लोरिडा येथे झालेल्या पावसामुळे मैदान ओले आहे. त्याचमुळे शनिवारी भारत - कॅनडा सामना खेळवणे शक्य नसल्याचा निर्णय सामनाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्याचमुळे सामना नाणेफेकही न होता अखेर रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण देण्यात आला आहे.

यासह कॅनडाचा या स्पर्धेतील प्रवास संपला आहे, तर भारतीय संघ आता सुपर-८ मधील सामना खेळेल. भारताचा सुपर-८मधील पहिला सामना २० जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध खेळवला जाणार आहे.

T20 WC, India vs Canada Live Score: सामन्यातील व्यत्यय कायम

मैदान पावसाच्या पाण्याने ओले असल्याने ८ वाजल्यानंतरही नाणेफक होऊ शकलेली नाही. त्यामुळे अद्यापही सामना सुरू होण्याची प्रतिक्षा कायम आहे.

T20 WC, India vs Canada Live Score: भारत-कॅनडा सामन्यात पावसाचा व्यत्यय; नाणेफेक उशीराने होणार

भारत आणि कॅनडा यांच्यात फ्लोरिडाला होणाऱ्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आहे. फ्लोरिडाला झालेल्या पावसामुळे सध्या मैदान ओले आहे. त्यामुळे नाणेफेक झालेली नाही. आता मैदानातील परिस्थिती भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता तपासले जाणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.

T20 World cup 2024, IND vs CAN Live Score update: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत शनिवारी (१५ जून) भारत विरुद्ध कॅनडा संघात सामना होणार आहे.हा सामना फ्लोरिडामधील लॉडरहिल येथील सेंट्रल ब्रोवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राऊंडवर होणार आहे.

हा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता, तर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होणार आहे. हा सामना पहिल्या फेरीतील भारत आणि कॅनडा या दोन्ही संघांचा अखेरचा सामना आहे.

मात्र, सध्या फ्लोरिडामध्ये गेल्या काही दिवसापासून पावसाचे वातावरण आहे. याचठिकाणी शुक्रवारी होणारा अमेरिका विरुद्ध आयर्लंड सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या भारत आणि कॅनडा सामन्यावरही पावसाचे सावट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

"खरे हिरो बाबाच!" शिवम दुबेने T20 World Cup चे मेडल घातलं वडिलांच्या गळ्यात; पाहा Video

Female Foeticide Law : 7 ते 10 वर्षांची जेल आणि थेट कारवाई! स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुसण्यासाठी सरकारने आखला 'हा' प्लॅन; आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

ठरलं! या दिवशी भेटीला येतेय 'मोहिनी'; कलर्स मराठीवर 'ही' गाजलेली मालिका होणार बंद? प्रेक्षक नाराज

Latest Marathi News Live Update : मुंबई-नागपूर महामार्गावर कारने चौघांना उडवलं

SCROLL FOR NEXT