IND vs CAN Weather Updates esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs CAN Weather Updates : भारत 'सराव' सामन्याविनाच सुपर 8 गाठणार; फ्लोरिडात टीम इंडिया पॅव्हेलियनमध्येच बसणार?

T20 World Cup 2024 : वादळी पावसामुळे भारत - कॅनडा सोडाच फ्लोरिडामधील सर्व सामने वॉश आऊट होणार?

अनिरुद्ध संकपाळ

IND vs CAN Weather Updates : भारत टी 20 वर्ल्डकप 2024 च्या ग्रुप स्टेजमधील आपला शेवटचा सामना आज खेळणार आहे. भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना फ्लोरिडाच्या स्टेडियमवर रंगणार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून फ्लोरिडामध्ये वादळी पाऊस पडतोय. या वादळी पावसामुळं युएसए आणि आयर्लंड यांच्यातील सामना देखील वॉश आऊट झाला होता. आता भारत - कॅनडा सामन्यावर देखील पावसाचं सावट आहे.

भारतीय संघ यापूर्वीच आपले पहिले तीन सामने जिंकून सुपर 8 मध्ये पोहचला होता. कॅनडावरूद्धच्या सामन्याकडे भारतीय संघ सुपर 8 पूर्वीचा सामना असं देखील पाहतो. मात्र लाऊडेरहिलमधील वातावरण पाहता भारताला सराव सामन्याविनाच सुपर 8 फेरी खेळावी लागण्याची शक्यता आहे.

कसं असेल फ्लोरिडाचं वातावरण?

weather.com ने दिलेल्या माहितीनुसार लौडेरहिल सिटीचे आजचे तापमान हे 30 डिग्री सेल्सियस असणार आहे. तर रात्री हे तापमान 25 डिग्री सेल्सियस पर्यंत खाली येईल.

15 जून शुक्रवारी आकाश ढगाळ असणार आहे तसेच वादळी पाऊस देखील पडण्याची शक्यता आहे. आज दिवसा पावसाची शक्यता ही 57 टक्के इतकी असेल. तर रात्री हीच शक्यता 27 टक्के इतकी असेल. हवेतील आद्रता सकाळी 78 टक्के तर रात्री 84 टक्के असेल.

सेंट्रल ब्रोवार्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राऊंडवर होणारे सामने

15 जून - भारत विरूद्ध कॅनडा

16 जून - पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT