IND vs CAN Playing 11 esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs CAN Playing 11 : रोहित विराटबाबत घेणार मोठा निर्णय? 3 सामन्यात फेल गेल्यानंतर...

T20 World Cup 2024 : रोहित शर्मा टी 20 वर्ल्डकप ग्रुप स्टेजमधील शेवटच्या सामन्यात मोठे बदल करण्याची शक्यता आहे.

अनिरुद्ध संकपाळ

IND vs CAN Playing 11 : भारत आणि कॅनडा यांच्यातील टी 20 वर्ल्डकपचा सामना फ्लोरिडा येथे खेळवला जाणार आहे. सध्या फ्लोरिडामध्ये तुफान पाऊस पडत आहे. भारताच्या दृष्टीकोणाने हा सामना एक सराव सामनाच आहे. त्यामुळे पावसामुळे सामना रद्द झाला तरी भारताच्या सुपर 8 मधील स्थानावर त्याचा काही परिणाम होणार नाहीये.

मात्र जर सामना झाला तर रोहित शर्मा या सामन्यात कोणती प्लेईंग 11 खेळवतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा विराट कोहलीबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. विराट कोहली आयपीएलच्या 17 व्या हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता.

मात्र टी 20 वर्ल्डकपमध्ये सलामीला खेळणाऱ्या विराट कोहलीला पहिल्या तीन सामन्यात फारशी चमक दाखवता आलेली नाही. त्याने तीन सामन्यात 1.66 च्या सरासरीने फक्त 5 धावा केल्या आहेत.

अमेरिकेविरूद्धच्या सामन्यात गोल्डन डकवर बाद झालेला विराट हा टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत आहे. कोहलीचा हा बहुदा शेवटचा टी 20 वर्ल्डकप आहे. त्यामुळे त्याच्यावर चांगली कामगिरी करण्याचा नक्कीच दबाव असणार आहे.

विराट कोहली यापूर्वी आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत होता. मात्र यंदाच्या वर्ल्डकपमध्ये तो रोहित शर्मासोबत सलामीला येतोय. विराट कोहली सोडला तर भारतीय संघातील जवळपास सर्व फलंदाजांनी कोणत्या ना कोणत्या सामन्यात चांगली कामगिरी केली आहे.

ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादवच्या खेळीमुळे विराट कोहलीची खराब कामगिरी लपून गेली. पंतने आयर्लंड आणि पाकिस्तानविरूद्ध अनुक्रमे 36 आणि 42 धावा केल्या आहेत. या दोन्ही सामन्यात भारताच्या विजयात पंतने मोलाचा वाटा उचलला. तो विराट कोहलीच्या म्हणजे क्रमांक 3 वर फलंदाजी करतोय.

सूर्यकुमार यादवची सुरूवात खराब झाली होती. मात्र युएसएविरूद्धच्या सामन्यात त्याने महत्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली. शिवम दुबेने देखील 31 धावा करत विजयात योगदान दिलं. त्यामुळं सुपर 8 मध्ये त्याचा प्लेईंग 11 मध्ये समावेश जवळपास निश्चित आहे.

भारतीय संघ कॅनडाविरूद्धच्या सामन्यात रविंद्र जडेजाऐवजी कुलदीप यादव किंवा युझवेंद्र चहल यापैकी एखादा फिरकीपटू चाचपून पाहू शकतात. कारण वेस्ट इंडीजमधील फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय संघ एक रिस्ट स्पिनर खेळवण्याची शक्यता आहे.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

Navi Mumbai : APMC मार्केटजवळ भीषण आग, १० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पो जळून खाक

Bus-Car Accident : कोल्हापुरातून महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत चौघे ठार, एक जण जखमी

Panchang 7 July 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

SCROLL FOR NEXT