IND-vs-PAK 
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs PAK: पार्थिवने निवडलं Playing XI, जाणून घ्या संघ!

विराज भागवत

भारताचा २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरूद्ध वर्ल्ड कपचा सामना

T20 World Cup 2021: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध अतिशय तणावपूर्ण आहेत. त्यामुळेच गेल्या कित्येक वर्षात भारत आणि पाकिस्तान यांच्यात ICC च्या स्पर्धा वगळता इतर वेळेस क्रिकेट सामने झालेले नाहीत. कोरोनाकाळात पाकिस्तानच्या काही माजी खेळाडूंनी भारताशी क्रिकेट सामने पुन्हा सुरू खेळले जायला हवेत असं मत मांडलं. भारतीय क्रिकेटपटू आणि क्रिकेट फॅन्सने या ऑफरला फारशी किंमत दिली नाही. पण, आता टी२० विश्वचषक स्पर्धेत मात्र हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे या सामन्यात भारताने कोणते ११ खेळाडू खेळवावेत याबद्दल भारताचा माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेलने मत व्यक्त केलं आहे.

"विराट कोहली कर्णधार असल्याने त्याला नक्कीच संघ कसा असावा याची कल्पना आहे. मला असं वाटतं की केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी डावाला सुरूवात करावी. विराटने तिसऱ्या, सूर्यकुमार यादवने चौथ्या आणि हार्दिक पांड्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला यावे. त्यानंतर मॅच फिनिशर म्हणून रविंद्र जाडेजाने सहाव्या क्रमांकावर खेळावं. गोलंदाजीबाबत बोलायचं तर राहुल चहर, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांना संघात स्थान मिळायलाच हवं. त्यासोबत शार्दूल ठाकूर आणि भुवनेश्वर कुमार यांनाही संघात संधी देण्यात यायला हवी", असे पार्थिव पटेल म्हणाला.

IND vs PAK

पाक क्रिकेट बोर्डाची BCCI बद्दल मवाळ भूमिका

"मी BCCI अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांच्याशी संवाद साधला. मी त्यांना विनंती केली की राजकारण बाजूला ठेवून खेळ जसा आहे तसा सुरू ठेवायला हवा. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधले संबंध तरी नक्कीच सुधारले जायला हवेत. भारत-पाक क्रिकेटला पूर्ववत आणण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागतील यात वादच नाही. पण आमच्यात चांगली चर्चा झाल्याने भविष्यात चांगल्या गोष्टी घडू शकतील", असा विश्वास रमीझ राजाने व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Facial Recognition: चेहरा स्कॅन, रिपोर्ट सेकंदात! स्टेशनमध्ये गुन्हेगार शिरताच पकडले जातील; पोलिसांची नवी सिस्टम अॅक्शनमध्ये

Meta ची मोठी कारवाई! १६ वर्षांखालील मुलांचं इंस्टाग्राम-फेसबुक अकाउंट्स १० डिसेंबरपर्यंत कायमची डिलीट होणार, हे आहे कारण

Kalyan crime : हिंदी बोलल्याने मराठी तरुणाला लोकलमध्ये मराठी लोकांची मारहाण, मानसिक तणावातून संपवले जीवन

Maharashtra Leopard : मानव-बिबट संघर्षावर उपाय; नसबंदीसाठी राज्य सरकारचा हिरवा झेंडा!

Tejashwi Yadav Reaction on Nitish Kumar Oath : नितीश कुमारांच्या शपथविधीनंतर तेजस्वी यादव यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

SCROLL FOR NEXT