IND vs SA T20 World Cup 2024 Finals Umpires sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 WC 24 Final Umpires : IND vs SA फायनल मॅचआधी ICCची घोषणा! पनौती अंपायरला मिळाली 'ही' मोठी जबाबदारी

IND vs SA T20 World Cup 2024 Finals Umpires : आयसीसीने भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यासाठी पंचांची घोषणा केली आहे.

Kiran Mahanavar

India vs South Africa T20 World Cup 2024 Finals : टी-20 वर्ल्ड कप 2024 चा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. हा हाय व्होल्टेज सामना बार्बाडोसमध्ये शनिवारी 29 जून रोजी खेळला जाणार आहे. दोन्ही संघांनी एकही सामना न गमावता अंतिम फेरी गाठली आहे. अशा स्थितीत फॉर्मात असलेल्या दोन संघांमध्ये चुरशीची लढत पाहिला मिळेल. दरम्यान आयसीसीने भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यासाठी पंचांची घोषणा केली आहे.

टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम सामन्यासाठी पंचांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. आयसीसीने सांगितले की अंतिम सामन्यातील मैदानी पंचाची जबाबदारी ख्रिस गॅफनी (न्यूझीलंड) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड) यांच्या खांद्यावर असेल, तर टीव्ही पंच रिचर्ड कॅटलबरो (इंग्लंड) असतील. आता या तिन्ही पंचांची नियुक्ती करण्याचे कारण म्हणजे त्यांची क्षमता तर आहेच, पण यापैकी कोणीही भारत किंवा दक्षिण आफ्रिकेशी संबंधित नाही.

रिचर्ड केटलबरो यांच्या उपस्थितीमुळे भारताची चिंता वाढली?

रिचर्ड केटलबरो 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये मैदानावरील पंच असणार नाही. पण, तो टीव्ही अंपायर असणार आहे. भारतीय सामन्यांमध्ये केटलबरोचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. जेव्हा-जेव्हा रिचर्ड कॅटलबरो बाद फेरीच्या सामन्यात पंच असतो, तेव्हा भारताने ते सामने गमावले आहेत. 1, 2 किंवा 3 नाही तर 7 बाद फेरीचे सामने याची साक्ष देतात.

29 जूनला रचला जाणार इतिहास

टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात हाय व्होल्टेज फायनल सामना होणार आहे. हा सामना २९ जून रोजी रात्री ८ वाजता सुरू होईल. हा सामना भारत किंवा दक्षिण आफ्रिका जिंकला तरी इतिहास रचला जाईल हे नक्की. खरं तर भारत आणि आफ्रिकेचे दोन्ही संघ या स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य आहेत, म्हणजेच दोघांनी एकही सामना गमावलेला नाही. एकही सामना न गमावता एखाद्या संघाने ट्रॉफी जिंकली असेल, असे आजच्या आधी कधीच घडले नव्हते. पण, यावेळी भारत-दक्षिण आफ्रिकेला हा विक्रम करण्याची संधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Code of Conduct: 'आमदार आले की उभं राहा'! महाराष्ट्र सरकारचा अधिकाऱ्यांना अजब आदेश; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : पुण्यात चुलत भावाकडूनच तरुणाची निर्घृण हत्या

Sharad Pawar: राज ठाकरेंसाठी शरद पवार आग्रही; काँगेसलाही दिला मेसेज, उद्धव ठाकरेंची भूमिका काय?

Pay and Park Issue : इस्कॉन मंदिराजवळील ‘पे अँड पार्क’मध्ये वाहनचालकांची लूट; महापालिकेच्या भक्तिवेदांत पार्किंगमधील प्रकार

Horoscope Prediction 2025: उद्या तयार होतोय केंद्र त्रिकोण योग, शनिदेवाच्या आशीर्वादाने मेष अन् मिथुनसह 'या' 5 राशींचे उजळेल भाग्य

SCROLL FOR NEXT