Justin Sammons named Zimbabwe cricket team head coach sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Team Head Coach : बोर्डाची मोठी घोषणा! टी-20 वर्ल्ड कपदरम्यान बदलला संघाचा हेड कोच; भारत-झिम्बाब्वे मालिकेत सांभाळणार कमान

Justin Sammons named Zimbabwe cricket team head coach : सध्या टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप खेळत आहे. त्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात उभय संघांमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे.

Kiran Mahanavar

Zimbabwe vs India T20I Series : सध्या टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप खेळत आहे. त्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात उभय संघांमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेपूर्वी झिम्बाब्वे संघाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळाला आहे.

टीम इंडियासोबतच्या टी-20 मालिकेपूर्वी जस्टिन सायमन्स यांची झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात 19 जून रोजी झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाची बैठक झाली ज्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

आता जस्टिन सॅमन्स टीम इंडियासोबत टी-20 मालिकेत झिम्बाब्वेचे मुख्य प्रशिक्षक असतील. बैठकीनंतर झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने स्वतः जस्टिन सॅमन्सच्या नावाची घोषणा केली.

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक डेव्ह हॉटन यांच्याकडे 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपपर्यंत संघाची जबाबदारी होती. मात्र खराब कामगिरीमुळे झिम्बाब्वेचा संघ यावेळी टी-20 वर्ल्ड कपमध्ये सुपर-8 साठीही पात्र ठरू शकला नाही. त्यामुळे डेव्ह हॉटन यांना प्रशिक्षकपद सोडावे लागले. आता जस्टिन सॅमन्सने डेव्ह हॉटनची जागा घेतली आहे. सॅमन्ससोबत झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू डियोन इब्राहिमही सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे.

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-20 मालिकेला 6 जुलैपासून सुरुवात होणार आहे. याबाबत दोन्ही संघांकडून लवकरच घोषणा केली जाऊ शकते. दुसरीकडे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकही या मालिकेपूर्वी बदलणार आहेत. या मालिकेत गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT