Kapil-Dev-Team-India 
क्रिकेट वर्ल्ड कप

"हीच योग्य वेळ! बड्या खेळाडूंना..."; कपिल देव यांचं मोठं विधान

भारतीय संघाची टी२० विश्वचषकात आतापर्यंत खराब कामगिरी | IND vs AFG in T20WC

विराज भागवत

भारतीय संघाची टी२० विश्वचषकात आतापर्यंत खराब कामगिरी | IND vs AFG in T20WC

IND vs AFG, T20 World Cup 2021: भारतीय संघाचा आज अफगाणिस्तानशी टी२० विश्वचषक स्पर्धा २०२१मधील तिसरा सामना रंगणार आहे. भारताने या स्पर्धेतील दोन सामने खेळून दोन्ही सामने गमावले आहेत. अफगाणिस्तानचा संघ मात्र तीनपैकी दोन सामन्यात विजय मिळवून स्पर्धेत भारतापेक्षा पुढे आहे. त्यामुळे भारताला आजचा आणि या पुढचे सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकणं अनिवार्य आहे. अशा वेळी, भारताचा विश्वविजेता कर्णधार कपिल यांनी संघातील वरिष्ठ आणि बड्या खेळाडूंबद्दल एक मोठं विधान केलं आहे.

"दुसऱ्या संघांच्या जीवावर टीम इंडिया पुढील फेरीत गेली असं झालं तर भारतीय चाहते त्याचा कधीच अभिमान बाळगणार नाहीत. तुम्हाला विश्वचषक जिंकायचा असेल किंवा सेमीफायनलमध्ये पोहोचायचं असेल तर तुम्हाला स्वत:च्या बळावर पुढे जावं लागेल. दुसऱ्या संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहण्यात काहीही अर्थ नाही. त्यामुळे आता निवड समितीने संघातील बड्या खेळाडूंना संधी द्यायची की नाही याचा नीट विचार केला पाहिजे. हीच वेळ आहे. बड्या खेळाडूंच्या भवितव्याचा आताच विचार करा", असा सल्ला कपिल देव यांनी निवड समितीला दिला.

IND vs AGF

"निवड समितीने एक विचार करायला हवा की ज्या युवा खेळाडूंनी IPL मध्ये चांगली कामगिरी केली आहे त्यांना संघात संधी द्यायला हवी की नको. ती वेळ अद्याप आली आहे की नाही? आपण पुढच्या फळीतील खेळाडू कसे घडवू शकतो यावर लक्ष देणं गरजेचं आहे. नव्या पिढीतील खेळाडूंचा संघ पराभूत झाला तर त्याचा फारसा विपरित परिणाम होणार नाही. याऊलट त्यांना चांगला अनुभव गाठीशी मिळेल. पण निवड समिती जर अनुभवी खेळाडूंनाच संधी देत राहिलं आणि त्यांनी चांगली कामगिरी केली नाही तर मात्र साऱ्यांवरच टीका होत राहिल. त्यामुळे आता BCCI ने यात लक्ष घातलं पाहिजे आणि जास्तीत जास्त युवा खेळाडूंना संघात स्थान दिलं पाहिजे", असं महत्त्वाचं विधान कपिल देव यांनी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT