Rohit Sharma Captaincy In T20 World Cup 2024 esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Rohit Sharma : शिव्या देतो... प्लेअरची धरतो कॉलर तरी कॅप्टन रोहित सर्वांना हवा हवासा का वाटतो?

T20 World Cup 2024 : रोहित शर्माची कॅप्टन्सी स्टाईल हटके आहे. त्याने टीम इंडियाचे कर्णधारपद स्विकारल्यापासून भारताने तीन आयसीसी स्पर्धेत फायनल गाठली आहे.

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma Captaincy In T20 World Cup 2024 : क्रिकेट हा कधीकाळी जंटलमन्स गेम होता. मात्र काळाच्या ओघात क्रिकेट अन् स्लेजिंग हे एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्यात. त्यात आता क्रिकेट माईक नको तितके अॅक्टिव्ह झाल्यानं काही लपून राहत नाही. भारताचा कर्णधार रोहित शर्मा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. गार्डन में घूमो मत नही तो... हाच तो फेमस व्हिडिओ.

जरी हा व्हिडिओ अनेकांना आक्षेपार्ह वाटला तरी ज्यांना उद्येशून तो बोलला त्यांना मात्र याचा काही फरकच पडत नाही. रोहित कधी कुलदीप यादवची कॉलर धरतो. तर कधी चहलला धोपटतो. मात्र तरी देखील त्याच्याबद्दल कोणालाच कोणतीही तक्रार नसते. रोहित या सर्वांना आपल्या हक्काचा कर्णधार वाटतो. बरं असं का?

साधा, सरळ अन् अॅक्सेसेबल

विराटच्या मते रोहितची भाषा ही मुंबईची टपोरी भाषा आहे. ही भाषा थोडी अधिकारवणीची वाटते. मात्र या टोनची टीम इंडियातील खेळाडूंना अडचण वाटत नाही. कारण हा भाषेचा टोन दोन मित्र संभाषण करत असताना वापरला जातो. रोहितची ही साधी सरळ सोपी भाषा आपुलकीची वाटते. म्हणूनच कुलदीप पासून आता आता संघात आलेल्या यशस्वीसाठी देखील रोहित मोठ्या भावासारखाच भासतो.

रोहितची ही अनफॉर्मल सो कॉल्ड टपोरी भाषा एक आपुलकी निर्माण करते. कर्णधार अन् त्याच्या टीममध्ये असलेला संवाद ज्यावेळी अनफॉर्मल अन् एक मित्रत्वाचं, मोठ्या भावाचं नातं निर्माण करणारा ठरतो त्यावेळी कर्णधाराला संघ सहकाऱ्यांकडून आपल्याला काय अपेक्षित आहे याचा क्लिअर मेसेज त्याच्यापर्यंत पोहचतो.

एका मुलाखतीत कुलदीपनं रोहित हा तर माझा कोच आहे असं म्हणाला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर एखादा कर्णधार खेळाडूला काही शिकवायला जात नाही. तो फक्त त्याच्याकडून कामगिरी करूवून घेत असतो. जर तो खेळाडू फेल गेला तर कर्णधाराकडं अजून काही पर्याय असतातच.

मात्र इथंच आहे रोहितचं वेगळेपण! रोहित आपल्या खेळाडूला काय अपेक्षित आहे हे सांगून थांबत नाही तर ते कशा प्रकारे करायचं आहे हे देखील ठासून सांगतो. त्याच्याकडून ते करवून घेतो. म्हणूनच कुलदीपनं रोहित माझा कोचच असल्याचं सांगतो. कारण त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये रोहितचा मोलाचा वाटा आहे.

सेल्फलेस कॅप्टन

रोहितनं यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये अजून एक गोष्ट अधोरेखित केलं. जर कर्णधार म्हणून तुम्ही इतर खेळाडूंकडून सेल्फलेस खेळण्याची अपेक्षा करता त्यावेळी तुम्हाला देखील तसंच खेळून सर्वांसमोर एक उदाहरण ठेवावं लागेल. गेल्या टी 20 वर्ल्डकपच्या पराभवानंतरच भारतीय संघ कशा प्रकारे क्रिकेट खेळणार हे रोहितनं स्पष्ट केलं होतं.

तेव्हापासून आतापर्यंत तो आपल्या रेकॉर्डची अर्धशतकाची किंवा शतकाची पर्वा न करता खेळत आला आहे. याचा टीमवर सकारात्मक परिणाम झाला. वनडे वर्ल्डकपमध्ये आपण फायनलपर्यंत सर्व सामने जिंकले. फक्त एक दिवस आपल्यासाठी खराब गेला.

यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये देखील भारतीय संघ सेल्फलेसली खेळला. याच उत्तम उदाहरण म्हणजे विराट कोहली. संघाने त्याला सलामीला येत आक्रमक फलंदाजी करण्याची जबबादारी दिली होती. त्याने ती निभावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. विराटला अपयश आलं. मात्र रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडने देखील त्याच्यावर विश्वास ठेवला. अपयश आलं मात्र तो टीमसाठी खेळला याची जाणीव या दोघांनीही ठेवली.

विश्वास ठेवला की खेळाडू सर्वस्व देतात

यंदाच्या टी 20 वर्ल्डकपसाठी निवडलेली भारताची टीम पाहिली तर अनेक खेळाडूंच्या सिलेक्शनवरून स्पर्धा सुरू होण्यापूर्वी चर्चा, टीका झाली. प्लेईंग 11 वरून देखील टीकेचा सूर उमटला. मात्र रोहितनं आपल्या खेळाडूंवर डोळे झाकून विश्वास ठेवला. मग तो खेळाडू फॉर्ममध्ये असो वा नसो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हार्दिक पांड्या!

हार्दिक पांड्याचा आयपीएलमधील फॉर्म खूपच सुमार होता. त्यात मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी रोहितकडून हार्दिककडे आली. त्यालाही वादाची किनार होतीच. मात्र देशहीत जपणं म्हणजे काय हे रोहितनं दाखवून दिलं. त्याला फास्ट बॉलिंग ऑल राऊंडर आपल्या संघात हवाच होता. वेस्ट इंडीजमध्ये पांड्या किती कामाला येणार हे त्याला ठाऊक होतं. वैयक्तिक हेवे दावे बाजूला सारून फॉर्ममध्ये नसलेल्या पांड्याला संघात घेतलं. उपकर्णधार केलं. पांड्यानेही विश्वास सार्थ करून दाखवला.

विराट अन् रविंद्र जडेजाच्या बाबतीत देखील तेच झालं. आयपीएलमध्ये धावांचा रतीब घालणारा विराट अचानक फ्लॉप जाऊ लागला. तरी देखील रोहितनं त्याच्या संघातील स्थानाला नख लावलं नाही. इतकंच काय तर जडेजाही गोलंदाजी अन् फलंदाजी दोन्ही पातळीवर भरीव कामगिरी करू शकत नव्हता. मात्र रोहितनं त्यालाही हात लावला नाही.

कारण रोहितला माहिती होतं की मोक्याच्या क्षणी हे दोन्ही खेळाडू संघाच्या कामाला येणार आहेत. सेमी फायनलमध्ये रविंद्र जडेजाची बॅट तळपली. शिवम दुबेबाबतही असंच झालं. मात्र रोहितनं त्याच्याही संघातील स्थानाला हात लावला नाही. त्यानं आपले प्लेअर बॅक केले. कारण त्याला त्या खेळाडूंची क्षमता माहिती होती.

सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, विराटसारखा रोहित हा काही भारतीय क्रिकेटमधला मेगास्टार नाहीये. तो टीम इंडियाचा कर्णधार झाला अन् सगळा फोकस त्याच्यावर आला. एक काळ असा होता की तो फक्त टी 20 अन् वनडे प्लेअरच होऊन बसला होता. मात्र आता कॅप्टन झाल्यापासून भारतीय संघाने तीन आयसीसी स्पर्धांची फायनल गाठली. दोन स्पर्धांमध्ये संघ फायनलपर्यंत अपराजित राहिला.

स्टारडमपासून दूर असलेल्या रोहितला एका मुलाखतीत तू कोणत्या सेलिब्रेटीसोबत जेवायला जायला आवडेल असे विचारल्यावर त्यानं मला यात काही रस नाही. मी आपली गार्डनवाली गँग त्यांच्यासोबत जाणं पसंत करेन असे उत्तर दिलं. इथंच तर रोहितच्या कॅप्टन्सीच्या यशाचं गमक लंपलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Nilesh Ghaywal : अशी झाली होती नीलेश घायवळच्या गुन्हेगारी साम्राज्याची सुरुवात, पुण्याच्या डॉनवर पहिला गुन्हा कधी व कुठे नोंदवला गेला होता?

Panvel Vasai Local: लवकरच पनवेल-वसई 'लोकल' धावणार! सकारात्मक चर्चा; बोरिवली-विरारपर्यंत विस्ताराची शक्यता

Tata Group: तुमच्या खिशात 14,996 रुपये असतील तर, तुम्ही टाटा कंपनीचे भागीदार बनू शकता, कसं ते जाणून घ्या

Kojagiri Pournima 2025: सुपरमून आज; चांदोबा होणार मोठा, कोजागिरी पौर्णिमेचा उत्साह, सोबत दोन ग्रहांची युती

'भाजप प्रवेशाचा निर्णय घ्यायला मला मंत्री मुश्रीफ यांनीच भाग पाडले'; 'या' माजी नगराध्यक्षांचा आरोप, राजकीय कोंडीचाही केला प्रयत्न

SCROLL FOR NEXT