India Vs Pakistan T20 World Cup 2024 sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

टी-20 वर्ल्ड कपमध्ये पुन्हा होणार IND vs PAK सामना? जाणून घ्या संपूर्ण समीकरण

India Vs Pakistan T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये पाकिस्तान संघाची कामगिरी खुपच खराब राहिली आहे.

Kiran Mahanavar

IND vs PAK scenario T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये पाकिस्तान संघाची कामगिरी खुपच खराब राहिली आहे. त्याने आपल्या प्रवासाची सुरुवात यूएसए विरुद्ध खेळून केली, ज्यामध्ये बाबर आझमच्या संघाला सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्याचवेळी, रविवारी बाबर आझमच्या संघाला स्पर्धेतील 19व्या सामन्यात भारताकडून 6 धावांनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. सलग दोन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर पाकिस्तानवर आता स्पर्धेतून बाहेर होण्याचा धोका आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यात उत्साहाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या, ज्याचा क्रिकेटप्रेमींनी चांगलाच आनंद लुटला. मात्र, या दोन संघांमधील आणखी एक सामना या स्पर्धेत होऊ शकतो. जवळपास हे शक्य आहे पण त्यासाठी काही गोष्टी पाकिस्तानच्या बाजूने जाणे आवश्यक आहे.

विशेष म्हणजे यावेळी या स्पर्धेत 20 संघ सहभागी झाले असून त्यांची 4 गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटात 5-5 संघ आहेत. ग्रुप स्टेज संपल्यानंतर केवळ 8 संघ दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरतील. याचा अर्थ प्रत्येक गटातून दोनच संघ पुढच्या टप्प्यात प्रवेश करतील, उर्वरित तीन संघांचा प्रवास संपेल.

दुसरी फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानला आगामी दोन सामन्यांमध्ये कॅनडा आणि आयर्लंडविरुद्ध मोठे विजय मिळवावे लागतील जेणेकरून त्यांचा नेट रन रेट चांगला होईल. त्याचबरोबर टीम इंडिया आणि आयर्लंड यांनाही आपापल्या सामन्यात यूएसएचा पराभव केला पाहिजे. यानंतर जर पाकिस्तानचा नेट रन रेट अमेरिकेपेक्षा चांगला असेल तर त्यांना सुपर-8 मध्ये प्रवेश मिळेल.

सुपर 8 मध्ये 8 संघ दोन गटात विभागले जाणार आहेत.

  • पहिल्या गटात - A1, B2, C1 आणि D2

  • दुसऱ्या गटात - A2, B1, C2 आणि D1

अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना उपांत्य फेरीतच शक्य आहे. ज्यासाठी सुपर 8 मध्ये जाण्याआधी भारतीय संघाला आपल्या गटातील पहिल्या स्थानावर टप्पा पूर्ण केला लागेल आणि पाकिस्तानला दुसरे स्थान मिळवावे लागले.

म्हणजे भारत सुपर 8 मध्ये पहिल्या गटात जाईल तर पाकिस्तान दुसऱ्या गटात. आता सुपर 8 मध्ये रोहित शर्माच्या संघाने पहिल्या गटात दुसरे स्थान मिळवले. आणि बाबर आझमच्या संघाला दुसऱ्या गटात अव्वल स्थान मिळवावे लागेल. तरच उपांत्य फेरीत भारत-पाकिस्तान सामना होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Oxford Naga Remains : १०० वर्षांनंतर पूर्वज परतले! इंग्रजांनी पळवून नेलेल्या ३९ मानवी कवट्या अखेर भारताला परत; लंडनमध्ये ऐतिहासिक सोहळा!

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! रत्नागिरी-रायगडमधील तीन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगरमध्ये ऊसदराचा तिढा कायम; पालकमंत्री राधाकृष्ण विखेंच्या अध्यक्षतेखाली झालेली दुसरी बैठकही निष्फळ

IND A vs ENG A: पुणे-मुंबईत इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे अन् टी२० सामन्यांसाठी भारतीय महिला अ संघाची घोषणा; अनुष्का शर्मा कर्णधार

Stories from The Forgotten War : ७४ वर्षांनंतर कोरियन युद्धातील अमेरिकन सैनिक दक्षिण कोरियात परतले; शहीद मित्रांच्या आठवणींनी दाटला कंठ!

SCROLL FOR NEXT