Lockie Ferguson NZ vs PNG esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Lockie Ferguson : 4 षटके... 0 धावा... 3 विकेट्स; टी 20 वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत कधीच घडलं नाही ते लोकीनं करून दाखवलं

T20 World Cup 2024 : यापूर्वी टी 20 वर्ल्डकपच्या इतिहासात कोणत्याही गोलंदाजाला 4 षटके निर्धाव टाकता आली नव्हती.

अनिरुद्ध संकपाळ

Lockie Ferguson NZ vs PNG : न्यूझीलंडचा स्टार वेगवान गोलंदाज लोकी फर्ग्युसनने आज पापुआ न्यू जिनिया संघाविरूद्ध इतिहासच रचला. टी 20 वर्ल्डकप 2024 मध्ये ग्रुप स्टेजमध्येच गाशा गुंडाळावा लागलेल्या किवींनी शेवट गोड केला. त्यांनी पीएनजीला 78 धावात गुंडाळलं. यात मोलाचा वाटा उचलला तो लोकी फर्ग्युसनने. त्याने 4 षटकात एकही धाव न देता 3 विकेट्स घेतल्या. टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात किफायतशीर गोलंदाजी करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कॅनडाच्या साद बिन जफरने 4 षटकात शुन्य धावा देत 2 विकेट्स घेतल्या होत्या. तो कॅनडाचा कर्णधार होता.

पावसाचा फटका बसलेल्या सामन्यात सामन्यात न्यूझीलंडने नवख्या पीएनजी संघाच्या फलंदाजांना चांगलंच दमवलं. तरी या नवख्या संघाने 20 व्या षटकापर्यंत तग धरला होता. मात्र 19.4 षटकात न्यूझीलंडने पापुआ न्यू गिनियाचा डाव 78 धावात संपवला.

लोकी फर्ग्युसनने 4 षटकात शुन्य धावा देत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला ट्रेंट बोल्टने आपल्या शेवटच्या सामन्यात 14 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. टीम साऊदी आणि इश सोधी यांनी देखील प्रत्येकी 2 विकेट्स घेत चांगली कामगिरी केली.

पापुआ न्यू गिनियाच्या 78 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडला देखील 3 विकेट्स गमवाव्या लागल्या. फिन एलन शुन्यावर तर डेवॉन कॉन्वे 35 धावांवर बाद झाले. तर रचिन रविंद्रला फक्त 6 धावा करता आल्या. त्यानंतर केन विलियम्सन आणि डॅरेल मिचेल यांनी डाव सावरत संघाला विजयी मार्गावर पुढं नेलं. पीएनजीकडून काबुआ मोरेआने दोन विकेट्स घेतल्या.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT