Mohammad Rizwan Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Mohammad Rizwan : व्यक्ती आजारी असेल तर ऑपरेशन गरजेचं... रिझवानने दिले मोठे संकेत, पाकिस्तान संघात होणार बदल?

Pakistan Cricket Team : पाकिस्तानच्या निवडसमिती अध्यक्षांनी मोठं वक्तव्य केलं होते. मोहम्मद रिझावनने त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

अनिरुद्ध संकपाळ

Mohammad Rizwan : पाकिस्तानचा सलामीवीर आणि विकेटकिपर मोहम्मद रिझवानने पीसीबीचे प्रमुख मोहसीन नक्वी यांनी दिलेल्या वक्तव्याशी सहमती दर्शवली आहे. नक्वी यांनी पाकिस्तान संघाची मोठी सर्जरी गरजेची असल्याच वक्तव्य केलं होतं. पाकिस्तानने टी 20 वर्ल्डकपमध्ये ग्रुप स्टेजमधूनच गाशा गुंडाळला होता.

पाकिस्तानच्या संघातील काही खेळाडू मायदेशात परतले आहेत. त्यात विकेटकिपर मोहम्मद रिझवानचा देखील समावेश आहे. त्याने मायदेशात परतल्यानंतर पेशावर येथे पत्रकारांशी संवाद साधला. तो म्हणाला की, 'संघावर होणारी टीका ही समजण्यासारखी आहे. आम्ही अपेक्षे प्रमाणे कामगिरी करू शकलो नाही. आमच्यावर टीका होणारच.'

तो पुढे म्हणाला की, 'टी 20 वर्ल्डकपमध्ये आमच्या कामगिरीमुळे चाहत्यांनी निराशा झाली आहे. आमच्या पराभवामागे अनेक कारणं आहेत. ज्यावेळी एखादा संघ हरतो त्यावेळी आपण फक्त बॉलिंगमुळे किंवा फलंदाजीमुळे हरलो असं म्हणू शकत नाही.

मोहम्मद रिझवानला वर्ल्डकपमध्ये 90.9 च्या स्ट्राईक रेटने 110 धावाच करता आल्या. तो भारताविरूद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहला मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला होता. आता रिझवानने संघातील अनेक खेळाडू आता ड्रॉप होतील असे संकेत दिले. संघात कोण राहणार अन् कोण जाणार हे पीसीबी प्रमुख ठरवतील याचे देखील संकेत दिले आहे.

रिझवान म्हणाला की, 'एखादा व्यक्ती आजारी असेल तर ऑपरेशन होणं साधारण गोष्ट आहे. ऑपरेशन गरजेचं देखील आहे. पीसीबी चेअरमन हे खूप हार्ड वर्किंग व्यक्ती आहेत. संघात कोणता खेळाडू राहणार कोणता जाणार हे ठरवण्याचा अधिकार चेअरमन यांचा अधिकार आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Top gaining stocks list: शेअर बाजार कोसळला तरी 'या' 5 शेअर्सनी दिले बंपर रिटर्न! फक्त पाच दिवसांमध्ये 47 टक्क्यांपर्यंत धावले

Uttarakhand: ट्रिप करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! भीमताल ते नैनीताल प्रवास होणार मिनिटांत? रोपवे प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Shirampur Murder: जेवण उशिरा मिळाल्याचा वाद जीवावर बेतला; हॉटेल मालकाची निर्घृण हत्या, श्रीरामपूर हादरले!

Latest Marathi News Update: आदिती तटकरे पालखी सोहळ्यामध्ये डोक्यावर तुळशी वृदांवन घेऊन सहभागी

SCROLL FOR NEXT