Mohammed Shami  Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Video : पाक चाहत्याशी भिडला होता शमी, कॅप्टन कूल धोनीनं केली होती मध्यस्थी

त्यामुळे ट्विटरवर मोहम्मद शमी चांगलाच ट्रेंडमध्ये दिसला.

सुशांत जाधव

Support to Mohammed Shami : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज लढतीनंतर माथेफिरी वृत्तीच्या नेटकऱ्यांनी भारताचा प्रमुख गोलंदाज असलेल्या मोहम्मद शमीला टार्गेट केलं. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सलामीच्या लढतीत टीम इंडियाला सलामीच्या सामन्यात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. याचा सर्व राग एकट्यावर काढला गेला. त्यामुळे ट्विटरवर मोहम्मद शमी चांगलाच ट्रेंडमध्ये दिसला.

सोशल मीडियाच्या माध्यमातून मोहम्मद शमीला टार्गेट करणाऱ्यांना अनेक दिग्गजांनी उत्तर दिले. आम्ही शमीच्या पाठिशी आहोत, असे सांगत क्रिकेटच्या देवासह मुल्तानचा सुल्तान विरेंद्र सेहवागने शमीच्या बाजूनं तुफान बॅटिंग करत नेटकऱ्यांना सुनावलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून शमीवर फिक्सिंगचा आरोप करणाऱ्यांना कदाचित अनेक गोष्टींचा विसर पडल्याचे दिसले. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमधील पराभवानंतरचा शमीचा तो आक्रमक अंदाज.

2017 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात मिनी वर्ल्ड कप समजल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीची फायलन रंगली होती. लंडनच्या ओव्हल मैदानात पाकिस्तान संघाने पहिल्यांदा बॅटिंगकरताना 338 धावांचा डोंगर उभारला होता. याचा पाठलाग करताना विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा संघ 158 धावांवर आटोपला होता. या सामन्यातील मोठ्या पराभवानंतर खांदे पाडून ड्रेसिंग रुममध्ये जात असताना काही पाकिस्तानी चाहत्यांनी 'बाप...कौन है कळलं का?... अशा भाषेत भारतीय संघातील खेळाडूंना डिवचण्याचा प्रकार केला होता. यावेळी मोहम्मद शमी त्या पाकिस्तानी चाहत्याला नडला होता. यावेळी धोनीने मध्यस्थी करत वाद मिटवून शमीला घेऊन गेल्याचे पाहायला मिळाले होते.

आयसीसी चॅम्पियनशिप फायनल लढतीत मोहम्मद शमी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. मात्र तरीही आपल्या संघातील सहकाऱ्यांना उद्देशून पाकिस्तानी चाहत्याने उच्चारलेल्या शब्दांमुळे त्याचा राग अनावर झाला होता. टीम इंडिया आणि सहकाऱ्यांसदर्भातील प्रेमाची आणि आदराची भावनाच मोहम्मद शमीने यावेळी दाखवून दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये सत्तासंघर्षाला नवं वळण! व्हीप न मानल्यास अपात्रतेची कारवाई, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपचा इशारा

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

Latest Marathi News Live Update : परभणीत ५ एकरातला ऊस जळून खाक

Uddahv Thackeray : ‘भाजपकडून राज्यात भ्रष्टाचाराचे प्रदूषण’

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० बिलियन डॉलर्सची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

SCROLL FOR NEXT