Netherlands vs Sri Lanka in T20 World Cup Warm-Up sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cupपूर्वी मोठा अपसेट...! चॅम्पियन संघाला नेदरलँड्सने पाजले पराभवाचे पाणी

2024 च्या टी-20 वर्ल्ड कपपूर्वी मोठी उलथापालथ पाहायला मिळाली; श्रीलंकेविरुद्ध नेदरलँड्सने 20 धावांनी सामना जिंकला

Kiran Mahanavar

Netherlands vs Sri Lanka in T20 World Cup Warm-Up : टी-20 वर्ल्ड कपचा मेगा इव्हेंटला सुरुवात होण्याच्या काही दिवसाआधी नेदरलँड्स क्रिकेट संघाने चॅम्पियन श्रीलंकेचा पराभव करून मोठा अपसेट निर्माण केला. टी-20 वर्ल्ड कप 2024 पूर्वी नेदरलँड्स आणि श्रीलंका यांच्यात सराव सामना खेळला गेला.

या सामन्यात नेदरलँड्सच्या गोलंदाजांसमोर श्रीलंकेचा संघ 161 धावांत गडगडला. आणि नेदरलँड्सने 20 धावांनी सामना जिंकला. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी हा विजय नक्कीच नेदरलँड्स संघातील खेळाडूंचे मनोबलही उंचावेल.

दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला. नेदरलँड्सच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना त्याने 20 षटकांत 5 गडी गमावून 181 धावा केल्या. यानंतर त्यांच्या गोलंदाजांकडून उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि श्रीलंकेचा संघ 18.5 षटकांत 161 धावांत सर्वबाद झाला आणि नेदरलँड्सने 20 धावांनी सामना जिंकला. श्रीलंका हा टी-20 वर्ल्ड कपतील सर्वात यशस्वी संघ आहे.

नेदरलँड्सने टी-20 वर्ल्ड कपच्या मुख्य स्पर्धेतही अनेक मोठ्या संघांना पराभूत केले आहे. 2009 मध्ये नेदरलँड संघाने इंग्लंडचा 4 गडी राखून पराभव केला होता. त्यानंतर टी-20 वर्ल्ड कप 2014 मध्ये देखील नेदरलँड्सने इंग्लंडचा 45 धावांनी पराभव केला होता. त्याच वेळी, गेल्या टी-20 वर्ल्ड कप नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा 13 धावांनी पराभव केला होता.

अशा स्थितीत यावेळीही मोठ्या संघांना नेदरलँड्सपासून सावध राहावे लागणार आहे. नेदरलँडचा संघ ड गटात आहे. या गटात नेदरलँड व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, नेपाळ आणि बांगलादेश यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : पूजा खेडकरच्या घरी चोरी, ८ दिवसांपूर्वी घरकामाला आलेल्या नेपाळी कामगाराने सगळ्यांचे मोबाईल नेले चोरून

BMC Election: ना प्रचाराचा धुरळा, ना आरोपांच्या फैरी! काय चाललंय मुंबईतील मतदारांच्या मनात?

Indian Railway: ब्रिटिश पोशाखाला अलविदा! आता भारतीय रेल्वेमध्ये गणवेशात येणार आधुनिक टच, अश्विन वैष्णव यांची घोषणा

'तान्हाजी द अनसंग वॉरियर'चा येणार सिक्वेल ? अजयच्या त्या पोस्टमुळे चर्चेला उधाण

Chandrashekhar Bawankule: काँग्रेसचा ‘लाडकी बहीण’ द्वेषाचा क्रूर चेहरा उघड: चंद्रशेखर बावनकुळे; पैसे रोखण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र!

SCROLL FOR NEXT