Martin Guptill T20 World Cup Twitter
क्रिकेट वर्ल्ड कप

मार्टिन गप्टील ठरला 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार

न्यूझीलंडकडून टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत शतकी खेळी करण्याचा पराक्रम हा ब्रँडम मॅक्युलमच्या नावे आहे.

सुशांत जाधव

New Zealand vs Scotland, 32nd Match : स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टीलने आश्वासक खेळी केली. एका बाजूने विकेट पडत असतान दुसरी बाजू सांभाळत त्याने संघाचा डाव सावरला. मात्र त्याचे शतक अवघ्या 7 धावांनी हुकले. त्याने 56 चेंडूत 6 चौकार आणि 7 षटकार खेचले. मॅकलॉर्डकरवी झेलबाद करत व्हीलने त्याच्या खेळीला ब्रेक लावला. यंदाच्या स्पर्धेत दुसरे शतक करण्याच्या गप्टीलकडे संधी होती. यापूर्वी इंग्लंडचा सलामीवीर जोस बटलर याने शतक झळकावले होते. मार्टिन गप्टीलने टी-20 कारकिर्दीत दोन शतके झळकावली आहेत. मात्र वर्ल्ड कप स्पर्धेत त्याच्या नावे एकही शतक नाही. न्यूझीलंडकडून टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत शतकी खेळी करण्याचा पराक्रम हा ब्रँडम मॅक्युलमच्या नावे आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये नव्वदीच्या घरात आउट होणारा तो पहिला खेळाडू नाही. यापूर्वी इंग्लंडचा एलेक्स हेल्स 99 धावांवर बाद झाला होता. 2012 मध्ये वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात शतकापासून एक धाव दूर असताना रवी रामपालने हेल्सला बोल्ड केले होते. टी-20 क्रिकेटमधील तो एकमेव खेळाडू आहे जो 99 धावांवर बाद झालाय. त्याच्याशिवाय युनिवर्सल बॉस अशी ओळख असलेल्या ख्रिस गेलही नर्व्हस नाइंटीचा शिकार ठरला आहे. 2010 मध्ये रंगलेल्या भारताविरुद्धच्या सामन्यात गेल 98 धावांवर बाद झाला होता. दिनेश कार्तिकने त्याला रन आउट केले होते.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याची पहिल्या वहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शतकाची संधी हुकली होती. न्यूझीलंड विरुद्ध पाँटिंगने 55 चेंडूत 8 चौकार आणि 5 षटकाराच्या मदतीने 98 धावा केल्या होत्या. शतकाशिवाय त्याच्यावर नाबाद राहण्याची वेळ आली होती. त्याच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने निर्धारित 20 षटकात 5 बाद 214 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने हा सामना 44 धावांनी जिंकला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajinkya Rahane Retirement: भारतीय क्रिकेटला मोठा धक्का; माजी कर्णधार अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

'मुलीच्या घराबाहेर थांबा' म्हणणं अल्लू अर्जुनला पडलं महाग; 'स्टॉकिंगला प्रोत्साहन' दिल्याचा आरोप करत केलं ट्रोल

Solapur News: मोहोळमध्ये तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवले; तरुणी बँक कर्मचारी अन् काय घडलं..

Latest Marathi News Live Update : पुण्यात संगमवाडी पार्किंग क्रमांक तीन जवळ एक कारचा अपघात

Pune Car Accident: पुण्यात भीषण अपघात! झाडाला एवढी जोरदार धडक की उन्मळून पडले, कारचा चक्काचूर... चालक स्टेअरिंगमध्ये अडकला

SCROLL FOR NEXT