Pooran goes on rampage as Omarzai concedes 36 in an over sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cupमध्ये कॅरिबियन तडाखा! निकोलस पूरनचा 'अग्नि तांडव', एकाच ओव्हरमध्ये ठोकल्या 36 धावा, Video Viral

36 runs in an over again : सध्या टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Kiran Mahanavar

Nicholas Pooran Wi vs Afg T20 World Cup 2024 : सध्या टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण या सामन्यात कॅरिबियन तडाखा पाहिला मिळाला. वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनने शानदार फलंदाजी केली. त्याने या सामन्यात 98 धावा ठोकल्या.

अफगाणिस्तान संघासाठी अझमतुल्ला ओमरझाईने तिसरे षटक टाकले. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर निकोलस पुरनने षटकार ठोकला. त्यानंतर दुसरा चेंडू नो बॉल ठरला, ज्यावर चौकार मारला. त्यामुळे अजमतुल्ला उमरझाई दडपणाखाली आला आणि त्याने तिसरा चेंडू वाईड टाकला, जो चौकार गेला.

अशाप्रकारे, पहिल्याच चेंडूवर अझमतुल्लाहने 16 धावा दिल्या. ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर एकही धाव आली नाही. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर पुरनने चौकार मारला आणि पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर त्याने षटकार ठोकला. अशा प्रकारे या षटकात एकूण 36 धावा आल्या.

  • पहिला चेंडू - षटकार

  • दुसरा चेंडू - जो नो बॉल होता, ज्यावर चौकार

  • त्यानंतर पुढचा चेंडू वाईड गेला, त्यावर चौकार

  • कायदेशीर दुसरा चेंडू – एकही रन नाही

  • तिसरा चेंडू - लेग बाय फोर

  • चौथा चेंडू - चौकार मारला

  • पाचवा चेंडू - षटकार मारला

  • सहावा चेंडू - षटकार मारला

टी-20 वर्ल्ड कपमध्ये हे दुसऱ्यांदाच घडले....

टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात एका षटकात 36 धावा झाल्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 36 धावा केल्या होत्या.

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली. निकोलस पूरनने 53 चेंडूत 6 चौकार आणि 8 षटकारांसह 98 धावा केल्या. शाई होपने 25 आणि कर्णधार रोव्हमन पॉवेलने 26 धावांचे योगदान दिले. या खेळाडूंमुळेच वेस्ट इंडिज संघाने 20 षटकात 218 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT