Pakistan Cricket Team Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

IND vs PAK : पाक भारताच्या एक पाऊल पुढे, Playing 11 ची केली घोषणा

बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघात अनुभवी आणि अखेरच्या टप्प्यात संघात समावेश झालेल्या शोएब मलिकचाही समावेश आहे.

सुशांत जाधव

T20 World Cup 2021, IND vs PAK : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताविरुद्धच्या सलामीच्या लढतीसाठी पाकिस्तान क्रिकेट संघाने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केलीये. सामन्याच्या एक दिवस अगोदरच पाकिस्तानने आपला संघ जाहीर केलाय. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील 12 सदस्यीय संघात अनुभवी आणि अखेरच्या टप्प्यात संघात समावेश झालेल्या शोएब मलिकचाही समावेश आहे. सध्याच्या घडीला पाकिस्तान क्रिकेट संघाने 12 खेळाडूंची नावे जाहीर केली असून यातील 11 जण प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळताना दिसतील.

क्रिकेटच्या नियमावलीनुसार, अंतिम प्लेइंग इलेव्हनची यादी ही नाणेफेकीनंतर जाहिर केली जाते. त्यामुळे पाकिस्तानने जाहिर केलेला संघ अंतिम आहे, असे म्हणता येणार नाही. अखेरच्या टप्प्यात त्यांना बदल करायचा झाल्यास तो बदल शक्य आहे. 24 आक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज सामना रंगणार आहे. आतापर्यंतच्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाला टीम इंडियाविरुद्ध एकही विजय नोंदवता आलेला नाही. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत दोन्ही संघ पाच वेळा समोरासमोर आले आहेत. यात पाचही वेळा टीम इंडियाने बाजी मारली आहे. यावेळी भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध विजयी षटकार मारण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. दुसरीकडे पाकिस्तानचा संघ आपली खराब कामगिरी सुधारण्यासाठी प्रयत्नशील असेल.

टीम इंडियाविरुद्ध असा असेल पाकिस्तानचा संघ

बाबर आझम, कर्णधार, रिझवान, फखर झमान, मोहम्मद हाफिज, शोएब मलिक, असिफ, इमाद, शदाबस हसन अली, शाहीन आफ्रिदी, हॅरिस, हैदर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT