T20 World Cup 2024 Gary Kirsten  esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024 : यश तेव्हाच मिळेल जेव्हा खेळाडू एकत्रित... पाकिस्तानचा कोच गॅरी कर्स्टनलाच भरवसा नाही

अनिरुद्ध संकपाळ

Gary Kirsten T20 World Cup 2024 : पाकिस्तानने 2009 मध्ये टी 20 वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर त्यांना एकदाही वर्ल्डकपवर पुन्हा नाव कोरता आलेलं नाही. यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये देखील पाकिस्तानचा संघ फार काही चांगली कामगिरी करू शकेल असं वाटत नाही. त्यात आता त्यांचा मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टनला देखील आपल्या संघाच्या यशाची शाश्वती नाहीये. तो वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वीच जर तरची भाषा करू लागला आहे.

वर्ल्डकप जिंकण्याची पाकिस्तानला किती संधी?

पाकिस्तानचा कोच झाल्यानंतर गॅरी कर्स्टनने त्याचा उत्साह बोलून दाखवला. तो म्हणाला की पाकिस्तान क्रिकेटसाठी हा रोमांचक काळ आहे. नवीन संघ व्यवस्थापन आणि खेळाडूंचा दृढ निश्चय आहे. मात्र पाकिस्तानला चांगली कामगिरी करायची असेल तर सांघिकरित्या कामगिरी चांगली करावी लागेल. एकमद खोलात जाऊन प्लॅनिंग करावं लागेल आणि खेळाडूंनी एकमेकांना भक्कम पाठिंबा दिला पाहिजे.

पाकिस्तानचा संघ ग्रुप A मध्ये असून हा ग्रुप तुलनेनं सर्वात सोपा मानला जात आहे. तरी देखील गॅरी कर्स्टन यांनी संघ टी 20 वर्ल्डकपमध्ये कशी कामगिरी करेल याबाबत बोलताना सावध पवित्रा घेतला आहे. पाकिस्तानचा पहिला सामना हा युएसएविरूद्ध आहे. त्यानंतर त्यांची खरी परीक्षा ही पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी भारतासोबतच्या सामन्यात होणार आहे.

पाकिस्तानचा कोच गॅरी कर्स्टन म्हणाला की, 'नवीन संघ व्यवस्थापन आणि खेळाडू हे उत्तम रिझल्ट आणण्यासाठी खूप उत्सुक आहेत. हा पाकिस्तान क्रिकेटसाठीचा उत्साहवर्धक काळ असणार आहे. आगामी टी20 वर्ल्डकप हा आमचे स्किल दाखवण्यासाठी आणि पाकिस्तानचा लौकिक मिळवण्यासाठी एक चांगली संधी असणार आहे.'

'मात्र असं असलं तरी स्पर्धेत यश मिळवण्यासाठी सांघिकदृष्ट्या प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यासाठी अत्यंत खोलात जाऊन प्लॅनिंग करावं लागेल. खेळाडूंनी एकमेकांना भक्कम पाठिंबा दिला पाहिजे.'

(Cricket Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arif Khan Chishti : मुस्लिम तरुणाचा मोठा निर्णय! संत प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची तयारी, वाचा कोण आहे आरिफ खान?

Whatsapp Mirror : व्हॉट्सअ‍ॅपवर एक परमिशन अन् बँक अकाऊंट रिकामं, 'हे' फेमस फीचर ठरतंय मोबाईल हॅकिंगचं कारण

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT