PAK vs NZ Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

पाककडून 'हिट लिस्ट'वरच्या न्यूझीलंडचाही खेळ खल्लास!

शोएब मलिक आणि असिफ अलीनं संघाला विजय मिळवून देणारी आश्वासक खेळी केली.

सुशांत जाधव

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानने न्यूझीलंडला पराभूत करत सलग दुसरा विजय नोंदवला आहे. या विजयासह पाकिस्तानचा संघ सुपर 12 मधील दुसऱ्या गटात पहिल्या स्थानवर पोहचलाय. न्यूझीलंडने दिलेल्या 135 धावांचा पाठलाग करताना शोएब मलिक आणि असिफ अली जोडीनं संघाला विजय मिळवून देणारी आश्वासक खेळी केली. शोएब मलिकनं 20 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 26 धावांची खेळी केली. दुसरीकडे असिफ अलीनं 12 चेंडूत नाबाद 27 धावा केल्या. आपल्या या छोट्याखानी खेळीत असिफ अलीनं 3 षटकार खेचले.

शारजाच्या मैदानात पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंडला नावाला साजेसा खेळ करता आला नाही. त्यांच्या एकाही खेळाडूला तिशीचा आकडा पार करता आला नाही. परिणामी न्यूझीलंडला निर्धारित 20 षटकात 8 बाद 134 धावांपर्यंतच मजल मारता आली.

या धावांचा पाठलाग कताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. कर्णधार बाबर आझमला स्वस्तात माघारी धाडण्यात न्यूझीलंडला यश आले. टिम साउदीनं त्याला क्लिन बोल्ड केले. ठराविक अंतराने एका बाजून विकेट पडत असताना मोहम्मद रिझवानने आणखी एक आश्वासक खेळी केली. त्याने 34 चेंडूत 5 चौकाराच्या मदतीने 33 धावा केल्या. मोहम्मद रिझवान बाद झाल्यानंतर सामना पुन्हा न्यूझीलंडच्या बाजूनं वळला होता. पण शोएब मलिक आणि असिफ अली यांनी सामना पुन्हा पाकिस्तान संघाच्या बाजूनं वळवला.

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. पण सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांनी पाक विरुद्धची नियोजित मालिका खेळण्यास नकार दिला. हा दौरा रद्द झाल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची चांगलीच गोची झाली. त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटकाही बसला. त्यामुळेच टी-20 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडचा हिशोब चुकता करु, अशा आशयाच्या प्रतिक्रिया पाकिस्तान क्रिकेट बोर्डासह दिग्गज पाक क्रिकेटपटूंनी दिल्या होत्या. पाकिस्तान संघाने न्यूझीलंडला पराभूत करुन त्यांना अखेर हिसका दाखवून दिला आहे. न्यूझीलंड पाठोपाठ इंग्लंडही त्यांच्या हिटलिस्टवर आहे. आगामी स्पर्धेत ते त्यांनाही मैदानात चोख प्रत्युत्तर देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nobel Prize 2026: फ्रान्सिस हॅल्झेन यांना भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर; अशक्य वाटणाऱ्या कल्पनेला वास्तवात आणलं...

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! मेट्रो डब्यांची संख्या वाढणार, घाटकोपर-वर्सोवादरम्यान सहा डब्यांची ट्रेन धावणार

Japanese Hair Care: जपानी महिलांच्या सिल्की-शायनी केसांचे रहस्य काय? १ रुपयाही खर्च न करता ट्राय करा 'या' ६ सोप्या ट्रिक्स...

Cabinet Meeting: विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी फायद्याची बातमी, कॅबिनेटच्या बैठकीत 7 धडाकेबाज निर्णय

Property Rights: सासू-सासऱ्यांच्या संपत्तीत सुनेला हिस्सा मिळतो का? घर, जमीन, दागिन्यांमध्ये कायदा काय सांगतो?

SCROLL FOR NEXT