Rashid Khan AFG vs BAN  esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

AFG vs BAN : ऑस्ट्रेलियाचा केला करेक्ट कार्यक्रम; बांगलादेशचा पराभव करत अफगाणिस्तानने रचला इतिहास

T20 World Cup 2024 : गुरबाजच्या 43 धावा अन् राशिदच्या 4 विकेट्स अफगाणिस्ताननं 115 धावांचे आव्हानही केलं डिफेंड

अनिरुद्ध संकपाळ

T20 World Cup 2024 : टी 20 वर्ल्डकप 2024 च्या सुपर 8 सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव करत इतिहास रचला. अफगाणिस्तानने टी 20 वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सतत पावसाचा व्यत्यय आलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशचा 8 धावांनी पराभव केला. अफगाणिस्तान 27 जूनला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध त्रिनिदाद येथे होणार आहे.

अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने दमदार गोलंदाजी करत 4 विकेट्स घेतल्या. त्यानं फलंदाजीतही महत्वांच योगदान दिलं होतं. त्याने तीन षटकारांसह 10 चेंडूत 19 धावा करत अफगाणिस्तानला 115 धावांपर्यंत पोहचवलं होतं. गुरबाजनेही 43 धावांची दमदार खेळी केली.बांगलादेशकडू लिटन दासने शेवटपर्यंत झुंज देत 54 धावा केल्या.

अफगाणिस्तानने 20 षटकात 115 धावा केल्या होत्या. मात्र पावसामुळे टार्गेट 19 षटकात 114 धावांचे आले. अफगाणिस्तानचा सलामीवीर गुरबाजने 55 चेंडूत 43 धावा करत अफगाणिस्तानचा डाव पुढे नेला. मात्र बांगलादेशच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत अफगाणिस्तानच्या फलंदाजांच्या मुसक्या आवळल्या होत्या.

बांगलादेशने अफगाणिस्तानची अवस्था 5 बाद 93 अशी केली होती. बांगलादेशच्या राशिद हुसैनने 3 विकेट्स घेत अफगाणिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले होते. मात्र राशिद खानने शेवटच्या टप्प्यात 10 चेंडूत 19 धावा केल्या. याच धावा पुढे सामना जिंकताना महत्वाच्या ठरल्या.

बांगलादेशने अफगाणिस्तानचे 116 धावांचे आव्हान पार करताना खराब सुरूवात केली. अफगाणी गोलंदाजांनी बांगलादेशची अवस्था 3 षटकात 3 बाद 23 धावा अशी केली. मात्र लिटन दासने एक बाजू लावून धरली होती. सोम्या सरकार आणि तोहिद ह्रदोय यासोबत महत्वाची भागीदारी रचली. बांगलादेशने सामन्यावर पकड निर्माण केली आहे असं वाटत असतानाच

राशिद खानने सौम्या सरकार, सोहिद अन् मोहम्मदुल्लाला देखील बाद करत बांगलादेशची अवस्था 6 बाद 80 धावा केली. सामन्यात सातत पाऊस पडत होता अन् सामना थांबवावा लागत होता.

दुसरीकडे लिटन दास अर्धशतक करत अफगाणिस्तानचं टेन्शन वाढवलं होतं. राशिदने दुसऱ्या राशिदला शुन्यावर बाद करत हे टेन्शन कमी केलं. त्यानंतर गुलबदीनने एक बाजू लावून धरलेल्या तनजीमला बाद करत अफगाणिस्तानची सामन्यावरील पकड मजबूत केली.

शतक पार पोहचवलेल्या बांगलादेशला शेवटचे दोन धक्के नवीन उल हकने दिले. त्याने टस्किनचा त्रिफळा उडवला तर मुस्तफिजूरला पायचित पकडलं अन् अफगाणिस्तानने इतिहास रचला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT