Angry Rashid Khan  esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Rashid Khan : दुसरी धाव नाकारली, कर्णधार राशिदने बॅटच फेकली... एवढंच नाही अफगाणिस्तान संघाचे अनेक Video होतायत ट्रेंड

T20 World Cup 2024: राशिद खान तसा शांत स्वभावाचा मात्र बांगलादेश सामन्यावेळी असं काही झालं की त्याला देखील राग अनावर झाला.

अनिरुद्ध संकपाळ

Rashid Khan Throw Bat Video : राशिद खान हा कायम हसत असतो. कितीही विपरित परिस्थिती असो राशिदच्या चेहऱ्यावरील कायम हास्य असतं. मात्र टी 20 वर्ल्डकप 2024 च्या सुपर 8 मधील बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार जाम भडकला होता. तो इतका चिडला की त्यानं आपला सहकारी करीम जनतच्या दिशेने बॅट फेकली.

हा प्रकार अफगाणिस्तानच्या बॅटिंगवेळी 20 व्या षटकात घडली. अफगाणिस्तानच्या संघाची अवस्था 5 बाद 107 धावा झाली होती. कर्णधार राशिद खान क्रिजवर उपस्थित होता. अफगाणिस्तानच्या धावा तशा कमी झाल्या होत्या. बांगलादेशचा गोलंदाज तंजीम हसन साकिब शेवटचे षटक टाकत होता.

करीम जनतने सिंगल करून राशिद खानला स्ट्राईक दिलं होतं राशिद खानने दुसऱ्या चेंडूवर षटकार मारला. तिसऱ्या चेंडूवर त्याने दोन चोरट्या धावा घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र करीमनं सिंगलनंतर कर्णधार राशिदला दुसऱ्या धावेसाठी नकार दिला. दुसऱ्या धावेसाठी मध्यापर्यंत आलेला राशिद यामुळं चिडला अन् त्यानं करीमच्या दिशेनं बॅट फेकली.

दुसऱ्या एका व्हिडिओत अफगाणिस्तानचे दोन फलंदाजी एकाच दिशेने धावताना दिसले. एक फलंदाज घसरून पडला. स्थिती अशी होती की दोन्ही फलंदाज एकाच क्रिजमध्ये पोहचले होते. तरी देखील बांगलादेशला एकाही फलंदाजाला रन आऊट करता आले नाही. गोंधळ झाला मात्र अफगाणिस्तानचे दोन्ही फलंदाज सुरक्षित आपापल्या क्रिजमध्ये पोहचले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT