Ravindra Jadeja  esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Ravindra Jadeja : मी टी 20 कारकिर्दीच्या शिखरावर... रोहित, विराट नंतर आता रविंद्र जडेजानेही घेतली निवृत्ती

Ravindra Jadeja T20 World Cup 2024 : रविंद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली.

अनिरुद्ध संकपाळ

Ravindra Jadeja : भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने देखील टी 20 क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. विराट कोहली, रोहित शर्मानंतर आता रविंद्र जडेजाने टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. हे तिघेही टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू आहेत. भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत वर्ल्डकप जिंकला. त्यानंतर संघातील या वरिष्ठ खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केली.

रविंद्र जडेजाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली की, 'माझं ह्रदय कृतज्ञतेनं भरलं आहे. मी आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. एका प्रमाणिकपणे पळणाऱ्या घोड्यासारखं मी देखील माझ्या देशासाठी कायम मी माझं सर्वस्व देण्याचा प्रय्तन केला आणि इतर फॉरमॅटमध्ये मी ते पुढे पण देईन.'

'टी २० वर्ल्डकप जिंकणं हे स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे. हे माझ्या टी 20 कारकिर्दीचं शिखर आहे. मला दिलेल्या समर्थनासाठी, आठवणींसाठी आणि उत्साहासाठी सर्वांचे आभार.'

रविंद्र जडेजाने 7 टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्याने 2009, 2010, 2014, 2016, 2021, 2022 आणि 2024 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाकडून खेळला. यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये रविंद्र जडेजाला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. त्याने 8 सामन्यात फक्त 35 धावा केल्या अन् फक्त 1 विकेट घेतली.

रविंद्र जडेजाने आपल्या टी 20 कारकिर्दीत 54 विकेट्स घेतल्या असून 515 धावा देखील केल्या आहेत. जडेजा भारताकडून वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये खेळणार आहे. भारतीय संघ आता 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT