T20 World Cup 2024 Richard Kettleborough esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup 2024 : केटलबॉरग अन् पराभव; नॉक आऊटमध्ये ऑस्ट्रेलिया नाही तर 'हा' अंपायर का ठरतोय भारतासाठी डोकेदुखी?

Richard Kettleborough : आयसीसी नॉक आऊटमध्ये भारताचा पराभव अन् अंपायर केटलबॉरग यांचा विचित्र योगायोग 2014 पासून सुरू झालाय.

अनिरुद्ध संकपाळ

T20 World Cup 2024 Richard Kettleborough : आयसीसीने नुकतेच टी 20 वर्ल्डकप 2024 च्या सुपर 8 मधील सामन्यासाठी अंपायर्सची घोषणा केली. मात्र या घोषणेनंतर भारतीय चाहत्यांच्या जिवाला घोर लागला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे सुपर 8 मध्ये एकमेकांना भिडणार आहेत. हा सामना 24 जून रोजी होणार असून या सामन्यासाठी रिचर्ड केटलबॉरग आणि रिचर्ड इलिंगवर्थ हे अंपायर्स असणार आहते.

जागतिक क्रिकेटमध्ये हे दोन्ही अंपायर्स हे चांगल्या दर्जाचे अंपायर म्हणून ओळखले जातात. मात्र या दोघांपैकी केटलबॉरग हे नाव भारतासाठी धडकी भरवणारं ठरतं. कारण रिचर्ड कॅटलबॉरग, आयसीसी नॉक आऊट आणि टीम इंडिया यांची भट्टी कधी जमलीच नाही.

कॅटलबॉरग टीम इंडियासाठी अनलकी?

कॅटलबॉरग हे अंपायर असताना भारतीय चाहत्यांचा कायम ह्रदयभंग झाला आहे. ज्या ज्यावेळी भारतीय संघ आयसीसी नॉक आऊटमध्ये हरला आहे त्या त्यावेळी कॅटलबॉरग अंपायर होते.

  • 2014 - टी 20 वर्ल्डकप फायनल, भारताचा श्रीलंकेकडून पराभव

  • 2015 - वनडे वर्ल्डकप सेमी फायनल, भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव

  • 2016 - टी 20 वर्ल्डकप सेमी फायनल, भारताचा वेस्ट इंडीजकडून पराभव

  • 2017 - चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, पाकिस्तानकडून भारताचा पराभव

  • 2019 - वनडे वर्ल्डकप सेमी फायनल, न्यूझीलंडकडून भारताचा पराभव

  • 2023 - वनडे वर्ल्डकप फायनल, ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव

कॅटलबॉरग आणि भारताचा आयसीसी नॉक आऊटमधील पराभव हा योगायोग वाईट असला तरी सामना जिंकणं आणि हरणं हे संपूर्ण खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून असतं. इंग्लंडचा हा अंपायर त्या बाबतीत काही करू शकत नाही. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यामध्ये कॅटलबॉरग सोबत असलेले दुसरे अंपायर इलिंगवर्थ हे देखील 2023 च्या फायनल सामन्यात अंपायरिंग करत होते.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT