Rohit Sharma - Rinku Singh Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Rinku Singh: T20 वर्ल्ड कपच्या भारतीय संघातून वगळल्यानंतर रोहित शर्माशी काय झालेली चर्चा? रिंकुने केला खुलासा

Rohit Sharma: टी20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात रिंकु सिंगला संधी देण्यात आलेली नाही. याबाबत त्याची रोहित शर्माशी चर्चा झाली होती.

Pranali Kodre

Rohit Sharma - Rinku Singh: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा 1 ते 29 जून दरम्यान वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी 15 जणांच्या भारतीय संघात रिंकु सिंगचीही निवड होईल, अशी अनेकांना अपेक्षा होती. मात्र, त्याला मुख्य 15 जणांच्या संघात स्थान देण्यात आले नाही.

भारताच्या निवड समितीने रिंकुचा 15 जणांच्या संघात समावेश न करता त्याला राखीव खेळाडूंमध्ये ठेवले.

रिंकु गेल्या काही महिन्यांपासून भारताच्या टी20 संघातील नियमित खेळाडू आहे, त्याची भारतासाठी कामगिरीही चांगली झाली आहे. पण असे असतानाही त्याला मुख्य संघात संधी न मिळाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले होते.

रिंकुसाठी वैयक्तिकरित्या आयपीएलचा 17 वा हंगाम फारसा चांगला राहिला नाही, त्याचमुळे त्याला भारतीय संघात स्थान न मिळाल्याचीही चर्चा झाली.

दरम्यान, 15 जणांच्या भारतीय संघात स्थान न मिळाल्यानंतर तो निराश झाल्याचे त्याने सांगितले होते. त्याचबरोबर त्याने रोहित शर्माने त्याला दिलेल्या संदेशाबद्दलही सांगितले.

दैनिक जागरणशी बोलताना रिंकु सिंग म्हणाला, 'हो, तुमची चांगली कामगिरी असूनही तुमची निवड न झाल्याबद्दल तुम्हाला वाईट वाटू शकते. तथापि, यावेळी माझी निवड संघ संयोजनाच्या कारणाने होऊ शकली नाही. पण ठीक आहे, ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात, त्याबद्दल फार विचार करू नये. हो मी सुरुवातीला थोडा निराश झालो होतो. पण जे काही होते, ते चांगल्यासाठी होते.'

तसेच रोहितबरोबर झालेल्या चर्चेबद्दल रिंकुने सांगितले, 'रोहित भैय्याने मला फार खास काही सांगितलं नाही, तो फक्त मला म्हणाला मेहनत करत रहा. दोन वर्षांनी पुन्हा टी२० वर्ल्ड कप आहे. खूप काळजी करण्याची गरज नाही. तो मला हेच म्हणाला.'

तसेच रिंकुने म्हटले की तो रोहितच्या नेतृत्वात फारसा खेळलेला नाही, पण तो युवा खेळाडूंना पाठिंबा देतो.

रिंकुने नुकतेच कोलकाता नाईट रायडर्सकडून आयपीएल 2024 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. त्याने आयपीएल 2024 मध्ये 14 सामन्यांत 168 धावा केल्या. तसेच त्याच्या भारतासाठीच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाले, तर त्याने 15 सामन्यांत 89 च्या सरासरीने 356 धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT