Rohit Sharma - Ritika Sajdeh | T20 World Cup 2024 Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Rohit Sharma: टी२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतरही रोहितच्या पत्नीला आहे एका गोष्टीचं दु:ख; सोशल मीडिया पोस्टमधून केलं स्पष्ट

Ritika Sajdeh: रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी20 मधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याची पत्नी रितिका सजदेहने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे, जी वेगाने व्हायरल होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Ritika Sajdeh Post for Rohit Sharma: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने 2024 च्या T20 विश्वचषकात जबरदस्त खेळ केला. रोमहर्षक फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारताने ट्रॉफीवर कब्जा केला. रोहित ब्रिगेडने 2023 मध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची संधी गमावली होती.

टी20 विश्वचषक जिंकल्याने अखेर भारताची ICC ट्रॉफीची प्रतिक्षा संपली. मात्र यानंतर रोहितने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. रोहितने ट्रॉफी जिंकल्याने पत्नी रितिका सजदेह खूश आहे, पण T20I मधून निवृत्ती घेतल्याने दुःखी आहे. तिने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे, जी वेगाने व्हायरल होत आहे.

रितिकाने सोमवारी इंस्टाग्रामवर पोस्ट मध्ये लिहिले की , "रो, मला माहित आहे की हे तुझ्यासाठी किती महत्त्वाचे आहे. हा फॉरमॅट, ही ट्रॉफी, हे लोक, हा प्रवास आणि तू ज्याचे स्वप्न पाहिले आहे ते साध्य करण्याची संपूर्ण प्रक्रिया."

"मला माहित आहे की गेले काही महिने किती कठीण होते. तुझ्या हृदयावर, मनावर आणि शरीरावर किती परिणाम झाला आहे, हे मला माहीत आहे, पण तुला तुझे स्वप्न पूर्ण करताना पाहणे हे खूप भावनिक आणि प्रेरणादायी होते."

रितिका म्हणाली की रोहितला आंतरराष्ट्रीय टी-20 सोडताना पाहणे सोपे नाही. रितिकाने पुढे लिहिले की, 'तू जे काही साध्य केलेस, तुझा हा खेळ आणि तुझ्या चाहत्यांचे प्रेम पाहुन, तुझी पत्नी आहे याचा मला खूप अभिमान आहे. पण तुझ्या खेळावर प्रेम करणारी व्यक्ती म्हणून मला वाईट वाटत आहे."

"मला माहित आहे की तू याबद्दल खूप विचार केला आहे, परंतु तुला टी२० क्रिकेट सोडताना पाहणे सोपे नाही, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुला माझा म्हणवून घेण्यात खूप अभिमान आहे.' रितिकाने हार्ट इमोजीही टाकला आहे.

भारताने 11 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी, 13 वर्षांनंतर विश्वचषक आणि 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकले आहे. फायनलनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला, 'हा माझा शेवटचा सामना होता.'

'निरोप घेण्याची हीच योग्य वेळ आहे. मला कोणत्याही किंमतीत ट्रॉफी जिंकायची होती. मला जे हवे होते आणि तेच घडले. मी माझ्या आयुष्यात या क्षणासाठी खूप आतुर होतो. आनंद आहे यावेळी जिंकू शकलो.'

रोहितने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 159 सामन्यांमध्ये 4231 धावा केल्या, ज्यात 5 शतके आणि 32 अर्धशतकांचा समावेश आहे. तो कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळत राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT