Rohit Sharma on his Retirement sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Rohit Sharma on his Retirement: 'मला निवृत्ती घेऊ वाटत नव्हती पण...', रोहित शर्माने रिटायरमेंटबाबत केला मोठा खुलासा

Rohit Sharma made a big revelation about retirement: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने T20 इंटरनॅशनलमधून निवृत्तीबाबत मोठा खुलासा केला आहे.

Kiran Mahanavar

Rohit Sharma on his Retirement From T20I : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने T20 इंटरनॅशनलमधून निवृत्तीबाबत मोठा खुलासा केला आहे. रोहित शर्माने T20 विश्वचषक ट्रॉफी जिंकल्यानंतर लगेचच निवृत्ती घेतली. त्याच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्य वाटले. रोहित शर्माने निवृत्तीच्या निर्णयावर धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की T20 मधून निवृत्ती घेण्याचा माझा कोणताही विचार नाही परंतु परिस्थिती अशी बनली की त्याने निवृत्ती जाहीर केली.

भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्मा पत्रकार परिषदेत आला आणि त्याने निवृत्ती जाहीर केली. विराट कोहलीप्रमाणेच तोही म्हणाला की, टीम इंडियासाठी हा त्याचा शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना होता. या फॉरमॅटला अलविदा करण्याची ही योग्य वेळ आहे. मला हेच हवे होते, मला कप हवा होता आणि मला तो मिळाला.

पत्रकारांशी संवाद साधताना रोहित शर्मा पुढे म्हणाला की, मी आता टी-20 आंतरराष्ट्रीय मधून निवृत्ती घेईन असे वाटले नव्हते. पण परिस्थिती अशी झाली. निवृत्तीची हीच योग्य वेळ आहे असे मला वाटले. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर निरोप घेण्यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. मी नक्कीच आयपीएल खेळत राहीन.

सर्व टी-20 वर्ल्ड कप खेळणारा रोहित शर्मा सध्या एकमेव भारतीय खेळाडू आहे. तो 2007 च्या टी-20 वर्ल्ड कप संघाचा भाग होता. त्यानंतर आता 2024 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली संघाने ही स्पर्धा जिंकली. रोहित शर्माने त्याच्या कारकिर्दीत एकूण 159 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि 4231 धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर सर्वाधिक पाच शतकांचा विक्रमही आहे. रोहितने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये एकूण 32 अर्धशतके झळकावली आहेत.

रोहित शर्मा व्यतिरिक्त विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनीही टी-20 इंटरनॅशनलमधून निवृत्ती घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

Pune News : खासगी ट्रॅव्हल्स बसेसना पुणे शहरात नवे नियम लागू, नवीन मार्गांची अंमलबजावणी सुरू

SCROLL FOR NEXT