rohit sharma confused about new york pitch india vs pakistan SAKAL
क्रिकेट वर्ल्ड कप

T20 World Cup : क्युरेटरच खेळपट्टीबाबत कन्फ्यूज, तर आम्हाला काय समजणार....; IND vs PAKमॅचआधी कर्णधार रोहितचे मोठे वक्तव्य

India vs Pakistan T20 World Cup 2024 : नासाऊ स्टेडियमवर बसवण्यात आलेल्या खेळपट्टीबाबत प्रश्नचिन्ह वाढत आहे. त्यातच आज भारत-पाक सामना होत आहे.

Kiran Mahanavar

India vs Pakistan T20 World Cup 2024 : नासाऊ स्टेडियमवर बसवण्यात आलेल्या खेळपट्टीबाबत प्रश्नचिन्ह वाढत आहे. त्यातच आज भारत-पाक सामना होत आहे. ही खेळपट्टी कशी असेल, याबाबत आम्ही क्युरेटरना विचारले तेव्हा तेही अनभिज्ञ राहिले, त्यामुळे आम्हाला खेळपट्टी कशी ओखळता येणार, असे मत भारतीय कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले.

चेंडू कमी-अधिक प्रमाणात उडत असलेल्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे आव्हानात्मक ठरले आहे. भारत-पाक सामन्यासाठी दोन दिवसांपासून पाणी देऊन अधिक प्रमाणात रोलिंग करण्यात आले, तरीही खेळपट्टी नक्की कशी असेल, याबाबत क्युरेटरना काहीच सांगता आले नाही. परिणामी, आजच्या सामन्याबाबत उत्सुकता वाढली आहे.

पूर्वीसारखी आता भारत-पाक सामन्याची उत्कंठा राहिलेली नाही, कारण गेल्या सहा महिन्यांत आम्ही आशिया करंडक आणि एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळलो आहोत, असे रोहित म्हणाला.

आयपीएलमध्ये मी रिषभ पंतची फलंदाजी पाहत होतो तेव्हाच त्याला या विश्वकरंडक स्पर्धेसाठी तिसऱ्या क्रमांकावर खेळवायचा हा विचार मी पक्का केला होता, असेही रोहितने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT