India vs South Africa T20 World Cup 2024 Final sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Ind vs SA : रोहितचा निर्णय आला अंगलट... प्रथम फलंदाजी करणे कितपत योग्य? अंगावर काटा आणणारा रेकॉर्ड

T20 World Cup 2024 Final Update : रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Kiran Mahanavar

India vs South Africa T20 World Cup 2024 Final : टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने विजेतेपदाच्या लढाईत आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

नाणेफेक जिंकल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, त्याला प्रथम मोठी धावसंख्या करून प्रतिस्पर्ध्यावर दबाव आणायचा आहे. मात्र, येथे प्रश्न असा आहे की, टीम इंडियाने बार्बाडोसच्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, हा योग्य निर्णय आहे का? कारण टी-20 वर्ल्ड कप फायनलचा रेकॉर्ड अंगावर काटा आणणारा आहे.

रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु रेकॉर्डनुसार, नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने टी-20 वर्ल्ड कपचे शेवटचे चार विजेतेपद सामने जिंकले आहेत.

2014 - भारताविरुद्ध नंतर फलंदाजी करताना श्रीलंका चॅम्पियन झाली.

2016 - इंग्लंडविरुद्ध नंतर फलंदाजी करताना वेस्ट इंडिज चॅम्पियन झाली.

2021 - न्यूझीलंडविरुद्ध नंतर फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया चॅम्पियन झाली.

2022 - पाकिस्तानविरुद्ध नंतर फलंदाजी करताना इंग्लंड चॅम्पियन झाली.

टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम सामन्यात पण कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय भारतासाठी योग्य ठरला नाही. या सामन्यात भारतीय संघाने अवघ्या 4.3 षटकात 34 धावा करत तीन विकेट गमावल्या आहे. टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली होती, पण दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराजने दुसऱ्याच षटकात कर्णधार रोहित शर्मा आणि ऋषभ पंतला बाद करत त्यांना अडचणीत टाकलं. यानंतर सूर्यकुमार यादवनेही स्वस्तात बाद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejas Fighter Jet Crash: एअर शोमध्ये मोठा अपघात! भारताचे तेजस लढाऊ विमान कोसळले; थरारक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : आजरा नगर पंचायतसाठी तिरंगी लढत

BIBI-ka-Maqbara: जागोजागी पडझड, सौंदर्य काळवंडले! हेच आहे का वारसा संवर्धन? बीबी-का-मकबरा विचारतोय प्रश्न

Viral Video: बिबट्या ड्रेस घालून नेहा कक्करने अंगावर ओतलं पाणी, लाईव्ह कॉन्सर्टमध्ये केलं अस काही की, नेटकरी म्हणाले...'मोगली सेना'

Controversy on Marathi: मराठी न बोलल्याने तरुणाला मारहाण! तणावातून विद्यार्थ्याने जीवन संपवले; ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT