Rohit, Virat And MS Dhoni Sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

बेस्ट लक भाऊ; धोनीसमोर विराटनं दिली रोहितकडे कॅप्टन्सी

विशेष म्हणजे रोहित कर्णधार असताना नियमित कर्णधार विराट कोहलीही मैदानात उतरला आणि त्याने गोलंदाजीही केली.

सुशांत जाधव

T20 World Cup Warm-up Match, India vs Australia : आयसीसी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसरा आणि अखेरचा सराव सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. दुबईच्या मैदानात रंगलेल्या या सामन्यात विराट कोहली ऐवजी रोहित शर्मा नाणेफेकीसाठी मैदानात आल्याचे पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सने सामन्यापूर्वीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत विराट कोहली धोनी आणि रवी शास्त्री यांच्यासमोर रोहितला कॅप्टन्सीसाठी बेस्ट लक देताना दिसते. विशेष म्हणजे नियमित कर्णधार विराट कोहलीही मैदानात नुसता दिसला नाही तर त्याने गोलंदाजीही केली.

अ‍ॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. डेविड वॉर्नरसोबत खुद्द कॅप्टन फिंचने ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुवात केली. पण या जोडीला आपल्या भात्यातील फटकेबाजी दाखवता आली नाही. अश्विनच्या गोलंदाजीवर उलटा-सुलटा शॉट खेळताना वॉर्नर आउट झाला. रिव्हर्स स्विप फटका खेळताना त्याने पायचितच्या स्वरुपात विकेट गमावली. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या मिचेल मार्शला अश्विनने आल्या पावली माघारी धाडले. त्याच्यानंतर रविंद्र जाडेजाने फिंचला तंबूचा रस्ता दाखवला.

ऑस्ट्रेलियाला सुरुवातीला तीन धक्के बसल्यानंतर विराट कोहलीने एक ओव्हर टाकली. ऑस्ट्रेलियाच्या डावातील सातवे षटक हे विराट कोहलीने टाकले. या षटकात त्याने 4 धावा खर्च केल्या. दरम्यान मुंबई इंडियन्सने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यापूर्वी विराट कोहली, रोहित शर्मा आणि एमएस धोनी या त्रिकूटाचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटोही चर्चेचा विषय ठरतोय.

विराट कोहली वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टी-20 संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. स्पर्धेपूर्वीच त्याने याची घोषणा केली आहे. त्याच्या जागी रोहित शर्मा भारतीय टी-20 संघाचे नेतृत्व करताना दिसेल, अशी चर्चा रंगताना पाहायला मिळते. याचेच चित्र ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यापूर्वी पाहायला मिळाले. इंग्लंडमध्ये रंगलेल्या 50-50 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर रोहित-विराट यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले होते. पण या दोघांमधील वाद आता मिटला आहे. विराट-रोहित एका फ्रेममध्ये दिसल्यानंतर पुन्हा एकदा या गोष्टीची पुष्टी झालीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nipah Virus Alert : सावधान! पश्चिम बंगालमध्ये आढळले ‘निपाह’ विषाणूचे रूग्ण; केंद्र सरकारकडून हालचालींना वेग

Pune News : सिंहगड रोड परिसरातील नागरिकांचा एल्गार; बिनविरोध निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले!

Bhogi Horoscope : भोगीनंतर 'या' 5 राशींचे भाग्य बदलणार; अचानक मिळतील पैसे, रखडलेली कामे पूर्ण होणार अन् ऑफिसमधून मिळेल खुशखबर

PMC Abhay Yojana : पुणेकरांनो घाई करा! अभय योजनेचे शेवटचे ७२ तास शिल्लक; ७५ टक्के सवलत गमावू नका!

Vande Bharat Sleeper Train: प्रतीक्षा संपली! देशातील पहिली ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ शनिवारपासून धावणार

SCROLL FOR NEXT